Home Uncategorized बेताल वक्तव्य करणाऱ्या अज्ञानी राज्यपालांची हकालपट्टी करा-हेमंत पाटील

बेताल वक्तव्य करणाऱ्या अज्ञानी राज्यपालांची हकालपट्टी करा-हेमंत पाटील

2 second read
0
0
317

no images were found

 

बेताल वक्तव्य करणाऱ्या अज्ञानी राज्यपालांची हकालपट्टी करा-हेमंत पाटील

मुंबई/ पुणे

महाराष्ट्राचे दैवत,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वतव्य करणारे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी,अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी केली आहे.छत्रपतींबद्दल आक्षेपार्ह विधान करीत देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांना पक्षेष्टींनीं पक्षातून निलंबित करण्याची मागणी देखील पाटील यांनी केली आहे.महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे लवकरच राज्यपालांसंबंधी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती हेमंत पाटील यांनी दिली आहे.

राज्यपाल वेळोवेळी वादग्रस्त वतव्य करतात.त्यांना इतिहासाची माहिती नाही.यापूर्वी देखील त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. असे असतानाही त्यांच्यावर आतापर्यंत कुठलीही कारवाई न झाल्याने ते निर्ढावले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करीत असलेले कार्य निश्चितच चांगले आहे.यात दुमत नाही. पंरतु, त्यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी करणे अत्यंत चुकीचे असून बौद्धिक दिवाळखोरीचे उदाहरण आहे.

कोश्यारी यांचे हे बेताल वक्तव्य देशवासियांच्या भावनेला,श्रद्धेला दुखावणारे आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाई ही गनिमी काव्याने लढली. छत्रपतींचे नाव ऐकुण औरंगजेब अस्वस्थ व्हायचा. महाराजांनी त्याची झोप उडवली होती. अशा औरंगजेबाची छत्रपतींनी पाच वेळा माफी मागितली, असे त्रिवेदी यांचे वतव्य त्यांच्या वैचारिक द्ररिद्रयाचे साक्ष देते.इतिहासाबद्दल माहिती नसतांना त्यासंदर्भात वक्तव्य करू नये, असा सल्ला पाटील यांनी त्रिवेदींना दिला आहे.त्रिवेदी यांची पक्षातून आणि कोश्यारींची महाराष्ट्रातून हकालपट्टी करण्याची मागणी पाटील यांनी यानिमित्त केली आहे.

 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …