Home राजकीय तो त्रिवेदी छत्रपतींविरोधात बोललाय, पाठराखण करणाऱ्या फडणवीसांवर संभाजीराजेंचा आसूड

तो त्रिवेदी छत्रपतींविरोधात बोललाय, पाठराखण करणाऱ्या फडणवीसांवर संभाजीराजेंचा आसूड

0 second read
0
0
46

no images were found

तो त्रिवेदी छत्रपतींविरोधात बोललाय, पाठराखण करणाऱ्या फडणवीसांवर संभाजीराजेंचा आसूड

परभणी : महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवरायांबद्दल भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आणि महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्ये करतात आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची पाठराखण करतात, हे कोडं आहे. ते त्यांची बाजू का घेतात? हा प्रश्न आहे. ना माफी मागायला लावा, असा आक्रमक पवित्रा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेऊन फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

फडणवीसांनी रविवारी माध्यमांशी बोलताना त्रिवेदी आणि कोश्यारींचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांच्या भूमिकेवर संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या काळाचे आदर्श आहेत. नव्या काळाचे आदर्श आंबेडकर ते गडकरी आहेत, असं वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारींनी केलं तर शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची ५  वेळा माफी मागितली, असे अकलेचे तारे भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी तोडले. शिवरायांविरोधी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. आज राज्यातल्या अनेक शहरात राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्याविरोधात आंदोलन होत आहे.

“या राज्यपालांना महाराष्ट्रात ठेऊ नका. पंतप्रधानांना वाटत असेल त्या राज्यात त्यांनी कोश्यारींना पाठवावं. पण कोश्यारींना लवकरात लवकर महाराष्ट्राबाहेर काढावं तसेच त्रिवेदीला माफी मागायला लावावी”, असं संभाजीराजे म्हणाले. शिवाजी महाराजांच्या इतिसाहाची मोडतोड होतीये, विपर्यास होतो, याविरोधात आवाज उठवणारा पहिला राजकारणी मीच होतो. शिवाजी महारांजवर सातत्याने अशी विधान येत आहेत. मागेही राज्यपालांना हटवा म्हणणारा मीच होतो. आताही मी मोदींकडे मागणी केली आहे. माझी भूमिका परखड असते. लपून छपून किंवा कुणाआडून मी बोलत नाही. फडणवीस त्यांच्या वक्तव्याचं समर्थन का करतात हा मला प्रश्न पडलाय. देवेंद्रंना इवढंच सांगतो, तो त्रिवेदी छत्रपतींविरोधात बोललाय म्हणजे बोललाय… अशा शब्दात त्रिवेदी आणि राज्यपाल कोश्यारींची पाठराखण करणाऱ्या फडणवीसांवर संभाजीराजेंनी आसूड ओढला. आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? असे विचारले तर कुणी सुभाषबाबू, कुणी नेहरू सांगत असे. पण आता तुमचे आदर्श कोण असे जर विचारले तर बाहेर कुठे जाण्याची गरजच नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला आयडॉल मिळतील. छत्रपती शिवराय तर जुन्या युगाचे आदर्श झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल कोश्यारींनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात बोलताना राज्यपालांनी

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…