no images were found
एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली
अहमदाबाद, : अदाणी समूहाचा भाग असलेल्या आणि भारतातील सर्वात मोठ्या खासगी ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि स्मार्ट मीटरिंग कंपनी असलेल्या अदाणी एनर्जी सॉल्यूशंस लिमिटेड (एईएसएल) ने 31 मार्च 2026 रोजी समाप्त झालेल्या तिमाही आणि आर्थिक वर्षासाठी आपली आर्थिक आणि कार्यकारी कामगिरी जाहीर केली असून सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि शिस्तबद्ध भांडवली व्यवस्थापनाच्या जोरावर मजबूत वाढ नोंदवली आहे.
कंपनीने आर्थिक वर्ष26 मध्ये ₹8,726 कोटींचा आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक EBITDA नोंदवला, जो वर्ष-दर-वर्ष 13% वाढ दर्शवतो, तर समायोजित नफा (PAT) 32% वाढून ₹2,393 कोटी झाला. वर्षभरातील एकूण उत्पन्न 15.9% वाढून ₹28,325 कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचले, ज्याला सुधारित ऑपरेटिंग परफॉर्मन्स आणि वाढलेल्या Service Concession Arrangement (SCA) उत्पन्नाचा आधार मिळाला. क्यू4 आर्थिक वर्ष26 मध्ये एकूण उत्पन्न 15% वाढून ₹7,588 कोटी झाले, EBITDA ₹2,372 कोटी (4.9% वाढ) आणि समायोजित PAT 27.7% वाढून ₹723 कोटी झाला.
एईएसएल ची कामगिरी विविध व्यवसायांमधील मजबूत अंमलबजावणीमुळे शक्य झाली. या कालावधीत कंपनीने मुंबई HVDC प्रकल्प, नॉर्थ करनपूरा ट्रान्समिशन, खवडा फेज II पार्ट-A, खवडा पूलिंग स्टेशन-1 आणि सांगोड ट्रान्समिशन यांसह पाच ट्रान्समिशन प्रकल्प कार्यान्वित केले. विशेष म्हणजे, मुंबईतील प्रगत VSC-आधारित HVDC प्रकल्प—जगातील पहिला कॉम्पॅक्ट HVDC—कार्यान्वित करून कंपनीने उच्च-दाब ट्रान्समिशन क्षेत्रातील आपले नेतृत्व अधिक मजबूत केले. तसेच, एईएसएल ने भारतात 1 कोटीहून अधिक स्मार्ट मीटर बसवणारी पहिली कंपनी बनत वीज वितरणातील डिजिटल परिवर्तनाला गती दिली.
कंपनीचा भांडवली खर्च (Capex) आर्थिक वर्ष26 मध्ये 1.24 पट वाढून ₹14,232 कोटी झाला, जो प्रकल्प अंमलबजावणीतील वेग दर्शवतो. एईएसएल कडे सध्या ₹71,779 कोटींच्या ट्रान्समिशन प्रकल्पांची मजबूत पाइपलाइन आहे. याशिवाय, स्मार्ट मीटरिंग व्यवसायात 2.46 कोटी मीटरचे ऑर्डर बुक असून त्यातून ₹29,519 कोटींची महसूल क्षमता आहे. ट्रान्समिशन क्षेत्रातील निकट भविष्यातील टेंडरिंग पाइपलाइन सुमारे ₹1.5 लाख कोटी इतकी मजबूत आहे, तर देशभरात स्मार्ट मीटरिंगसाठी 103 दशलक्ष मीटरची संधी उपलब्ध आहे.
कंपनीच्या कामगिरीबाबत बोलताना, कंदर्प पटेल, मुख्य कार्यकारी अधिकारी, अदाणी एनर्जी सोल्युशन्स म्हणाले, “आर्थिक वर्ष26 मध्ये सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि शिस्तबद्ध भांडवली व्यवस्थापनाच्या जोरावर आम्ही मजबूत कामगिरी केली याचा आम्हाला आनंद आहे. क्यू4 आर्थिक वर्ष26 मध्ये आम्ही मुंबई HVDC प्रकल्पासह पाच ट्रान्समिशन प्रकल्प कार्यान्वित केले, ज्यामुळे भारतात दोन HVDC प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करणारी आम्ही एकमेव खासगी क्षेत्रातील कंपनी ठरलो आहोत. या वर्षात आम्ही 1 कोटी स्मार्ट मीटर बसवण्याचा महत्त्वाचा टप्पा पार केला असून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणीतील आमचे नेतृत्व अधिक बळकट झाले आहे. पुढे पाहता, आमच्या सर्व व्यवसायांमध्ये वाढीची मजबूत संधी असून विस्तारत असलेला अॅसेट बेस, मजबूत HVDC पाइपलाइन आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी यामुळे आम्ही पुढील वाढीसाठी सज्ज आहोत.”
ऑपरेशनल स्तरावरही एईएसएल ने सर्व विभागांमध्ये मजबूत कामगिरी नोंदवली. ट्रान्समिशन व्यवसायात सिस्टीम उपलब्धता 99.7% पेक्षा जास्त राहिली, तर एकूण ट्रान्समिशन नेटवर्क 27,949 ckm पर्यंत वाढले. मुंबई वितरण व्यवसाय (AEML) मध्ये 99.99% वीज पुरवठा विश्वसनीयता राखली गेली असून वितरणातील तोटा फक्त 4.20% इतका कमी राहिला. स्मार्ट मीटरिंग व्यवसायातही वेगाने वाढ झाली असून एकूण 113.6 लाख मीटर बसवण्यात आले आहेत.
आर्थिक बाबतीत, आर्थिक वर्ष26 मध्ये ऑपरेशनल महसूल ₹18,296 कोटी राहिला, जो 7.3% वाढ दर्शवतो. नव्याने कार्यान्वित ट्रान्समिशन प्रकल्प आणि स्मार्ट मीटरिंगमधील योगदानामुळे ही वाढ साध्य झाली. कंपनीचा एकत्रित ऑपरेशनल EBITDA ₹7,407 कोटी झाला, जो 12.7% वाढ आहे, आणि ट्रान्समिशन, वितरण आणि स्मार्ट मीटरिंग या सर्व विभागांमध्ये स्थिर कामगिरी नोंदवली गेली.
या कालावधीत एईएसएल ने आपली आर्थिक आणि गव्हर्नन्स स्थितीही अधिक मजबूत केली. कंपनीला Japan Credit Rating Agency कडून BBB+ (Stable) दीर्घकालीन विदेशी चलन रेटिंग मिळाले, जे भारताच्या सार्वभौम रेटिंगशी सुसंगत आहे. तसेच, Adani Electricity Mumbai Limited (AEML) ला प्रस्तावित NCDs साठी India Ratings आणि CRISIL कडून AAA (Stable) रेटिंग मिळाले.
ESG क्षेत्रातही एईएसएल ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कंपनीला CareEdge-ESG 1+ रेटिंग (86.8/100 स्कोअर) मिळाले असून शाश्वतता आणि गव्हर्नन्समधील तिची मजबूत बांधिलकी अधोरेखित झाली आहे. तसेच, कंपनीला भारतातील टॉप 60 शाश्वत कंपन्यांमध्ये स्थान मिळाले असून पर्यावरणीय उपक्रमांसाठी विविध सन्मानही प्राप्त झाले आहेत.
एईएसएल भारतातील ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ट्रान्समिशन, वितरण आणि स्मार्ट मीटरिंग या सर्व क्षेत्रांमध्ये मजबूत उपस्थिती, वाढणारा अॅसेट बेस आणि मोठी प्रकल्प पाइपलाइन यांच्या जोरावर कंपनी दीर्घकालीन आणि शाश्वत वाढीसाठी सज्ज आहे, तसेच लाखो ग्राहकांना विश्वसनीय, परवडणारी आणि हरित ऊर्जा पुरवण्यास कटिबद्ध आहे.