no images were found
एसूस कडून ए आय -शक्तीवर चालणाऱ्या ExpertBook अल्ट्रा लॅपटॉपचे भव्य लॉन्च; P सिरीजचाही विस्तार
कोल्हापूर — एसूस ने आज आपल्या बिझनेस लॅपटॉप पोर्टफोलिओमध्ये मोठी भर घालत ए आय -आधारित फ्लॅगशिप एक्स्पर्टबुक अल्ट्रा सादर केला. यासोबतच कंपनीने एक्स्पर्टबुक पी सिरीजचा विस्तार करत पी 3 आणि पी 5 मॉडेल्सही बाजारात आणले आहेत. “चिंतामुक्त व्यवसाय” या संकल्पनेवर आधारित ही नवीन लाइनअप भारतातील उद्योग आणि व्यावसायिकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे.
एक्स्पर्टबुक अल्ट्रा हा अत्यंत हलका (सुरुवात 0.99 किग्रॅ) आणि प्रीमियम लॅपटॉप असून, एरोस्पेस-ग्रेड मॅग्नेशियम-अॅल्युमिनियम मिश्रधातूपासून तयार करण्यात आला आहे. यामध्ये नवीनतम इंटेल कोअर अल्ट्रा सिरीयस 3 प्रोसेसर, शक्तिशाली GPU आणि प्रगत NPU यांचा समावेश आहे, जे एकत्रितपणे उच्च-स्तरीय ए आय कम्प्युटिंग अनुभव देतात.
या लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा 3K OLED टचस्क्रीन डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, 1400 निट्स ब्राइटनेस, 6-स्पीकर डॉल्बी ऑडिओ सिस्टम आणि 26 तासांपर्यंत टिकणारी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, NIST-मानकांनुसार एंटरप्राइझ-ग्रेड सुरक्षा आणि मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा (MIL-STD 810H) ही याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
एक्स्पर्टबुक अल्ट्रा विशेषतः कक्सस , आय टी तज्ञ आणि उच्च-स्तरीय व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आला असून, तो कार्यक्षमता, पोर्टेबिलिटी आणि सुरक्षा यांचा उत्कृष्ट समतोल साधतो.
दरम्यान, एक्स्पर्टबुक पी सिरीजमध्ये पी 3 आणि पी 5 मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे. ही मॉडेल्स विविध कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असून, 14-इंच आणि 16-इंच डिस्प्ले, 64GB पर्यंत RAM आणि ड्युअल SSD सपोर्टसह उच्च स्केलेबिलिटी देतात. ही सिरीज स्टार्टअप्सपासून मोठ्या एंटरप्राइझपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरेल.उपलब्धता आणि किंमत: एक्स्पर्टबुक अल्ट्रा आजपासून फ्लिपकार्ट वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून, त्याची सुरुवातीची किंमत ₹2,39,990 आहे. लॉन्च ऑफरअंतर्गत 5 वर्षांची वॉरंटी, बॅटरी कव्हर आणि अपघाती नुकसान संरक्षणासह अनेक फायदे दिले जात आहेत.
एक्स्पर्टबुक पी 3ची किंमत ₹94,990 पासून सुरू होते, तर P5 लवकरच ₹2,14,990 पासून उपलब्ध होईल.एसुस च्या मते, ही नवीन लाइनअप भारतीय व्यवसायांना ए आय युगात अधिक सक्षम, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.