Home मनोरंजन सचिन पिळगावकर यांना गंधार गौरव पुरस्कार जाहीर

सचिन पिळगावकर यांना गंधार गौरव पुरस्कार जाहीर

0 second read
0
0
103

no images were found

सचिन पिळगावकर यांना गंधार गौरव पुरस्कार जाहीर

‘गंधार’ या नाट्य संस्थेच्या वतीने यंदाचा ‘गंधार गौरव पुरस्कार’ सचिन पिळगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे.  मनोरंजन क्षेत्रात सचिन पिळगावकर एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. असंख्य चित्रपटातून त्यांनी भूमिका अजरामर केल्या आहेत. मराठीच तसेच हिंदीतही त्यांनी अतुलनीय कलाकारी सादर केलेली आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी ‘गंधार’ संस्थेच्या वतीने यंदाचा ‘गंधार गौरव पुरस्कार 2022’ हा त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

सचिन पिळगावकर हे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. सध्या ‘गंधार’ या नाट्य संस्थेच्या वतीने यंदाचा ‘गंधार गौरव पुरस्कार’ सचिन पिळगावकर यांना जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार बालदिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२२ रोजी गडकरी रंगायतन येथे स. ११ वा. आयोजित सोहळ्यात देण्यात येणार आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार ऍड. आशिष शेलार आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते पिळगावकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. या सोहळ्याचे हे ७ वे वर्षे असून ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर,  अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे यांना आतापर्यंत गंधार गौरव सोहळ्याने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांना जाहीर झाला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…