no images were found
इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांची नोंद करावी– उपनियंत्रक रा.ना.गायकवाड
कोल्हापूर : राज्यातील दुग्ध संकलन केंद्रावर दुध खरेदी-विक्री मधील गैरप्रकार रोखणे व ग्राहकांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी ग्राहक हितार्थ दुग्ध संकलन केंद्रांवर दुध मापनासाठी इलेक्ट्रीक तोलन उपकरणांचा वापर करण्यात येतो. त्या ठिकाणी 10 ग्रॅम अचुकतेचे वर्ग -3 असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांची नोंद करावी, असे आवाहन वैधमापन शास्त्राचे उपनियंत्रक रा. ना. गायकवाड यांनी केले आहे
जिल्ह्यातील सर्व दुध संकलन केंद्रांवर आदेशामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही दि. 1 जानेवारी 2023 पूर्वी करावी, असेही आवाहन उपनियंत्रक वैधमापन शास्त्र, कोल्हापूर यांच्याकडून करण्यात येत आहे. अन्यथा आदेशाप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, याची दुध संकलन करण्यासाठी वापर करणाऱ्या तोलन उपकरणांच्या उपयोगकर्त्यांनी नोंद घ्यावी.