Home शासकीय शहरातील नाले सफाईची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

शहरातील नाले सफाईची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

18 second read
0
0
116

no images were found

शहरातील नाले सफाईची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

 

कोल्हापूर (प्रतिनिधी):- शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळयापूर्वी शहरातील सर्व नाले सफाईची कामे महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात आली आहेत. या नालेसफाईच्या कामाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज सकाळी अचानक पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत सहा.आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक विजय पाटील उपस्थित होते. या नाले सफाईमधून आज अखेर 15141 टन गाळ नाल्यातून काढण्यात आला आहे.

         यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी राजेंद्रनगर, हुतात्मा पार्क, गाडी अड्डा, व्हीनस कॉर्नर या ठिकाणी सुरु असलेल्या कामाची केली. यानंतर महापालिकेकडे नुकतचे नविन दाखल झालेल्या जेट मशीनद्वारे नागाळा पार्क येथे सुरु असलेल्या ड्रेनेज लाईन सफाईच्या कामाची पाहणीही त्यांनी केली. यावेळी प्रशासकांनी नाल्याच्या बाजूला काढलेला गाळ पाणी निचरा झालेवर तातडीने उठाव करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळयापुर्वी शहरातील सर्व ड्रेनेज लाईन क्लीन करावीत. ड्रेनेज लाईन सफाईचे नियोजन करा. वारंवार चोकअप होणारी ठिकाणे निश्चित करुन ती वेळोवेळी क्लीन करुन घेण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरिक्षकांना दिल्या.

         महापालिकेच्यावतीने नाले सफाईमधून आज अखेर 15141 टन गाळ नाल्यातून काढण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या नाल्यांची 2 पोकलँड मशीनद्वारे, मध्यम नाल्यांची जेसीबीच्या सहाय्याने व 65 कर्मचाऱ्यांच्या दोन पथकामार्फत ही नाल सफाई करण्यात येत आहे. 2 पोकलॅन्ड मशिनद्वारे जयंती नाला ते सिध्दार्थनगर पुल, सुतार वाडा ते कल्याण ज्वेलर्स, गाडीअड्डा ते व्हिल्सन पुल, व्हल्सिन पुल ते हॉटेल सुखसागर, हॉटेल सुखसागर ते रिलायन्स मॉल, यादव नगर ते हुतात्मा पार्क येथील नाल्यांची सफाई करण्यात आली आहे.

         तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ASUSकडून MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती

ASUSकडून MSME क्षेत्रासाठी राजीव तलरेजा यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती कोल्हापूर : एसूस …