
no images were found
डॉ. वोरा यांचे तज्ञ मत: अॅलो व्हेरा आणि कोकोनटसह केसांचे उष्णता व आर्द्रतेपासून संरक्षण करा
उन्हाळा आला असताना उष्णता व आर्द्रतेमुळे केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. केस कोरडे होणे आणि केस तुटणे असा सतत संघर्ष करावा लागू शकतो, ज्यामुळे केस कमजोर व निस्तेज दिसतात.
उष्णता आणि आर्द्रतेमुळे केसांना होणारे नुकसान माहित असणे आवश्यक आहे. प्रखर सूर्यप्रकाश आणि उच्च तापमानामुळे केसांमधील नैसर्गिक मॉइश्चर कमी होते, ज्यामुळे केस कोरडे, कमकुवत होत तुटतात. म्हणून उन्हाळ्यादरम्यान केसांमधील ओलावा कायम राहणे महत्त्वाचे आहे.
मेरिको येथील प्रमुख आरअँडडी ऑफिसर आणि हेअर केअरमधील प्रतिष्ठित तज्ञ डॉ. शिल्पा वोरा केसांचे दोन प्रमुख घटक अॅलो व्हेरा व कोकानटचा वापर करत उष्णता व आर्द्रतेच्या प्रतिकूल परिणामांपासून संरक्षण करण्याबाबत त्यांचे मत सांगत आहेत. हे परिपूर्ण सोल्यूशन व अद्वितीय संयोजन केसांमधील ओलावा कायम राखत केसांना पोषण देते.
हायड्रेटिंग व आल्हाददायी गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे अॅलो व्हेरा विशेषत: उन्हाळ्यामध्ये अत्यंत गुणकारी आहे. अॅलोची पौष्टिकता असलेले हे ऑइल केसांमधील मॉइश्चर कमी होण्याला प्रतिबंध करते / केसांमधील मॉइश्चर कायम ठेवते, ज्यामुळे केस कोमल, स्मूद बनतात आणि सहजपणे व्यवस्थित ठेवता येतात. डॉ. वोरा म्हणाल्या, ”केस कोमल, हायड्रेटेड/पोषक राहण्याच्या खात्रीसाठी पॅराशूट अॅडवान्स्ड अॅलो व्हेरा एनरिच कोकोनट बेस्ड हेअर ऑइल हेअर केअर रूटिनमधील परिपूर्ण भर आहे. हे वजनाने हलके, नॉन-स्टिकी सूत्रीकरण पोषण देते, ज्यामुळे केस संपूर्ण उन्हाळ्यादरम्यान दुप्पट कोमल होतात, ज्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागत नाहीत. हेअर ऑइल केसांमध्ये जवळपास ३० मिनिटांसाठी ठेवा आणि त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून असे दोन-तीन वेळा केल्यास केसांमधील मॉइश्चर कायम राहते, केस कुरळे होण्यावर नियंत्रण राहते आणि केस कोमल होण्यासोबत केसांना उत्तम पोषण मिळते.”
उष्णता व आर्द्रतेपासून केसांचे संरक्षण पॅराशूट अॅडवान्स्ड अॅलो व्हेरा एनरिच कोकोनट बेस्ड हेअर ऑइलसह सोपे झाले आहे, ज्यामुळे तुम्ही दररोज सर्वोत्तम लूक प्राप्त करू शकता.