
no images were found
शिवाजी विद्यापीठामध्ये राष्ट्रभक्ती जागृती सप्ताहाअंतर्गत रक्तदान शिबिर
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- भारत पाकिस्तान युध्दजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभर ‘राष्ट्रभक्ती जागृती सप्ताह’ साजरा करण्याबाबत मा.कुलपती कार्यालयाने निर्देशित केले आहे. त्यानुसार, शिवाजी विद्यापीठामार्फतही ‘देशभक्ती सप्ताह’ दि.13 ते 20 मे या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. याची सुरूवात म्हणून आज, दि.13 मे रोजी दसरा चौक ते बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक आणि पुन्हा छत्रपती प्रमिला राजे रूग्णालयामार्गे दसरा चौक असे प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रभात फेरीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, डॉ.सरिता ठकार, डॉ.तानाजी चौगुले, डॉ.शरद बनसोडे यांचेसह दीडशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
याच उपक्रमाचा भाग म्हणून दि.17 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधीत विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच, रक्ताचा संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन विद्यार्थी, शिक्षक, इच्छुक रक्तदाते आणि समाजातील सजग नागरिकांनी या शिबिरामध्ये मोठया प्रमाणात रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.