
no images were found
‘जाने अनजाने हम मिले’ साठी आयुषी खुराणाने दिला अव्वल परफॉर्मन्स वॉटर टँक दृश्यासाठी
टेलिव्हिजनवरील शोसाठी चित्रीकरण करताना अनेकदा अनपेक्षित आव्हाने येत असतात आणि अभिनेत्री आयुषी खुराणाला असा अनुभव झी टीव्हीवरील ‘जाने अनजाने हम मिले’मध्ये एक गहन अंडरवॉटर दृश्य साकारताना आला. दीर्घ काळासाठी ह्या अभिनेत्रीला एका वॉटर टँकरमध्ये पाण्याखाली राहावे लागले, पण तिने ते आव्हान अतिशय उत्साह आणि निर्धाराने स्वीकारले.
थंड पाण्यात अॅडजेस्ट होण्यापासून शरीराचा तोल सांभाळण्यापर्यंत ते भावनिकदृष्ट्या जबरदस्त परफॉर्मन्स देण्यापर्यंत ह्या दृश्याने तिच्या सहनशक्तीची अक्षरशः परीक्षा पाहिली. तिच्या पोशाखाच्या वजनाने तिची हालचाल कठीण झाली आणि थंड पाण्यामुळे आव्हानातही भर पडली. मात्र, टीमचे समर्थन आणि तिच्या निर्धाराने तिने हे दृश्य अगदी सहजपणे साकारले. त्या टँकमध्ये शिरणे हेच मोठे काम होते. पण क्रू ने तिला चांगले मार्गदर्शन केले आणि खात्री करून घेतली की तिला सुरक्षित वाटेल. एकदा आत शिरल्यानंतर ती पटकन आजूबाजूच्या वातावरणाला सरावली आणि आपला शॉट अचूक बनवण्यावर तिने लक्ष केंद्रित केले.
चित्रीकरणाबद्दल आयुषी म्हणाली, “मला आव्हाने आवडतात. एक कलाकार म्हणून हे क्षण तुम्हांला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आणतात आणि तेव्हाच खरे शिकायला मिळते. अख्ख्या युनिटने मदत केली. मी कम्फर्टेबल असल्याची खात्री केली. ज्याक्षणी मी टँकमध्ये शिरले तेव्हाच मला कळले की हे दृश्य अन्य दृश्यांपेक्षा किती वेगळे आहे. जेव्हा मी टँकमध्ये प्रवेश केला तेव्हाच थोडी थबकले कारण पाणी अपेक्षेपेक्षा जास्त थंड होते आणि माझा पोशाख लगेचच जड झाला आणि टँकमध्ये त्यामुळे हालचाल करणे थोडे कठीण जात होते.”
ती पुढे म्हणाली, “मला अंडरवॉटर माझा बॅलेन्सही सांभाळावा लागत होता, ज्यामुळे मी तिथे सहजपणे आहे असे वाटावे. त्याचवेळेस पाण्यामुळे दीर्घ टेक्सनंतर मला माझे डोळे उघडे ठेवणेही कठीण जात होते, पण मी काही दीर्घ श्वास घेतले आणि त्या वातावरणात बऱ्यापैकी सरावले आणि मग वारंवार स्वतःला शांत आणि एकाग्र राहण्याची आठवण करून दिली. दृश्यानंतर पाण्याच्या बाहेर निघणे थोडे कठीण जात होते कारण माझा पोशाख जड होता आणि मग काही क्रू सदस्यांना माझी मदत करावी लागली. ह्या अशाच गोष्टींमुळे अभिनय रोमांचक बनतो. दर दिवशी नवीन काहीतरी शिकायला मिळते आणि ह्या प्रवासातील ती गोष्ट मला सर्वांत जास्त आवडते.”
आयुषी ह्या मालिकेतील हे दृश्य अव्वल पद्धतीने साकारते, प्रेक्षकांसाठी त्यांच्या आयुष्यातील नाट्य उलगडताना पाहणे रोचक ठरेल कारण तिला राघव भरत अहलावतच्या आईचे सत्य कळेल.