
no images were found
जागतिक आरोग्य दिनी कलाकार शेअर करत आहेत व्यायामापासून ते वेलनेसपर्यंतच्या हेल्थ टिप्स
या जागतिक आरोग्य दिनी सोनी सबचे कलाकार- नवीन पंडिता, आरव चौधरी, प्रियंवदा कांत आणि आदित्य रेडिज आपला फिटनेस मंत्र सांगत आहेत. त्यांच्यासाठी आरोग्य हे ध्येय नाही, तर जगण्याची रीत आहे. अत्यंत धकाधकीची दिनचर्या असूनही आहार संतुलित ठेवण्यापासून ते आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे अभिनव मार्ग हे कलाकार शोधून काढतात. ते शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याला देखील तितकेच प्राधान्य देतात. त्यांची गोष्ट ऐकून आपल्याला जाणवते की वेलनेस ही तर नित्यनेमाने साधण्याची गोष्ट आहे. कणखर आणि प्रेरित राहण्यासाठी हे कलाकार काय करतात, हे त्यांच्याकडूनच ऐकू या!
‘पुष्पा इम्पॉसिबल’ मालिकेत अश्विन पटेलची भूमिका करणारा नवीन पंडिता म्हणतो, “माझ्यासाठी, फिटनेस म्हणजे समतोल! मी एक दिवसाआड वेट लिफ्टिंग करतो, आणि जेव्हा मी ते करू शकत नाही, तेव्हा तरीतरीत राहण्यासाठी किमान 8000 पावले चालण्याची काळजी घेतो. मला खायला आवडते, पण मी विचारपूर्वक खातो आणि शिस्त पाळतो. फिटनेस म्हणजे केवळ शारीरिक आरोग्य नव्हे! मानसिक शांती आणि स्थिरता म्हणजे देखील फिटनेस. त्यावर मी दररोज डोळसपणे मेहनत घेतो.”
‘वीर हनुमान’ मालिकेत केसरीची भूमिका करणारा अभिनेता आरव चौधरी म्हणतो, “फिटनेस सांभाळण्यासाठी शिस्त सर्वात महत्त्वाची आहे. विशेषतः अशा उद्योगात, जेथे कामाच्या वेळेला फारशी शिस्त नाही आणि लांबलचक शेड्यूलमुळे तुमचे शरीर थकते. त्यामुळे मी विचारपूर्वक आहाराची निवड करतो, केवळ जिभेचे चोचले न पुरवता मला ऊर्जा देतील असे पोषक पदार्थ निवडतो. तसेच हायड्रेटेड राहणे देखील फार महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळे मी तरतरीत राहतो आणि आरोग्य चांगले राहते. शारीरिक आरोग्याबरोबरच मी पुरेसा आराम करण्याला देखील प्राधान्य देतो. कारण व्यायामाइतकीच रिकव्हरी देखील गरजेची असते. माझ्यासाठी, फिटनेस केवळ तो नाही, जो तुमच्या बाह्य रुपातून दिसतो. तर फिटनेस म्हणजे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आतून सक्षम वाटते. आणि त्याच्यामुळे मी दररोज माझे सर्वोत्तम देऊ शकतो.”
‘तेनाली रामा’ मालिकेत शारदा ही भूमिका साकारणारी प्रियंवदा कांत म्हणते, “फिटनेस हा दैनिक व्यायामापेक्षा वेगळा असतो. फिटनेस ही जीवन जगण्याची रीत आहे. अगदी धकाधकीच्या दिवशी केलेला छोटासा प्रयत्न देखील मौल्यवान असतो. तो प्रयत्न म्हणजे झटपट वर्कआउट असो, स्ट्रेचिंग असो किंवा चालणे असो, असा प्रत्येक क्षण योगदान देत असतो. केवळ शारीरिक सामर्थ्य नाही, तर विचारपूर्वकता महत्त्वाची आहे. मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद असला पाहिजे. कारण मन शांत असले की ते शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करते. क्रिएटिव्ह वर्कआउट करून मी व्यायामातील रोमांच जपते. त्यासाठी डान्सिंगपासून योग वगैरे करते. जेव्हा फिटनेस आनंददायक असतो, तेव्हाच तो तुम्हाला प्रेरित ठेवतो. माझ्यासाठी आरोग्य म्हणजे संतुलन – शरीराचे पोषण करणे, योग्य प्रमाणात शरीराला आराम देणे आणि पडद्यावर किंवा पडद्याच्या मागे नेहमी तरतरीत, आनंदी राहणे.”
‘तेनाली रामा’ मालिकेत राजा कृष्णदेवरायाची भूमिका करणारा आदित्य रेडिज म्हणतो, “माझ्यासाठी फिटनेस म्हणजे केवळ कसरत नाही. फिटनेस म्हणजे अंतर्बाह्य तरतरीत वाटणे. शिस्त आणि नियमितता यांना मी पहिल्यापासून महत्त्व दिले आहे, जेव्हा फारसा उत्साह वाटत नाही, तेव्हाही. वर्कआउट आणि क्रिएटिव्ह हालचाली, जशा की डान्स, हायकिंग किंवा सक्रिय जीवनशैली यांचे संतुलन साधण्याचा माझा प्रयत्न असतो. मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एक छानसा वॉक किंवा दीर्घ श्वसनाने देखील कधी कधी घडी नीट बसते. शेवटी, संतुलन हेच महत्त्वाचे- चांगली झोप, डोळस आहार आणि केव्हा आराम करायचा याची जाण.”