Home शासकीय राजारामपुरीतील शाहू जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लावू :- राजेश क्षीरसागर

राजारामपुरीतील शाहू जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लावू :- राजेश क्षीरसागर

1 second read
0
0
31

no images were found

राजारामपुरीतील शाहू जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लावू :- राजेश क्षीरसागर

कोल्हापूर :- कोल्हापूर हे कलानगरी सह क्रीडानगरी म्हणून ओळखले जाते. गेल्या काही वर्षात शहरातील सर्वच खेळाच्या उपलब्ध सुविधा आणि मैदानांच्या दुरावस्थेचा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, मैदानांचे नूतनीकरण व्हावे यासाठी शासनाकडून निधी मंजूर करून खेळाडूंना सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. राजारामपुरी परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध असणारा एकमेव जलतरण तलाव गेल्या काही वर्षापासून बंद असून, त्यामुळे जलतरणपटूची गैरसोय होत आहे. याबाबत तात्काळ महापालिका आयुक्तांशी बैठक घेवून, राजारामपुरीतील शाहू जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष नामदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

राजारामपुरी येथील शिवसेना शाखेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष नामदार राजेश क्षीरसागर यांच्याहस्ते दिमाखात पार पडला. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटनही नामदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”, “शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांचा विजय असो” अशा घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

कार्यक्रमाच्या सुरवातीस बोलताना माजी महापौर दीपक जाधव यांनी, कोल्हापूर जिल्ह्याला राज्य नियोजन मंडळाची कार्यपद्धती काय असते याची माहिती न्हवती.

कोल्हापूर जिल्ह्याला या पदाची आणि त्यामाध्यमातून होणाऱ्या विकास कामांची माहिती मिळाली. यापूर्वी जिल्ह्यास एक – दोन कोटींचे निधी मिळायचे आणि त्याची जाहिरातबाजी व्हायची. पण, आता क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी मिळत आहे. आगामी काळातही क्षीरसागर यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होईल अशी आशा व्यक्त करत राजारामपुरी परिसरातील शाहू जलतरण तलावाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी राजेश क्षीरसागर यांच्याकडे केली.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, शिवसेनेचे संपर्क कार्यालय, शाखा हे जनसेवेचे मंदिर असून, लोकांना न्याय देण्यासाठीच अशा मंदिरांची स्थापना शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढताना शिवसेनेने लाखो लोकांना न्याय मिळवून दिला. यातूनच शिवसेनेचे संघटन मजबूत होत गेले. सन १९८६ साली कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे रोपटे लावले. जेष्ठ शिवसैनिकांच्या साथीने याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. शिवसेनेच्या शाखा, कार्यालये यातून गोरगरीब, कष्टकरी नागरिकांची सेवा होते. या शाखांच्या माध्यमातून आरोग्याच्या, शैक्षणिक, महिला सबलीकरणाच्या, जेष्ठ नागरिकांच्या योजना राबवाव्यात, असे आवाहन केले.

यावेळी शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, शहरप्रमुख रणजीत जाधव, जेष्ठ शिवसैनिक सुशील देसाई, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, सामाजिक कार्यकर्ते रहीम सनदी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…