Home मनोरंजन ‘तेनाली रामा’ मालिकेत विषकन्या आणि तिने राजावर केलेले हल्ले तेनाली परतवून लावू शकेल का?

‘तेनाली रामा’ मालिकेत विषकन्या आणि तिने राजावर केलेले हल्ले तेनाली परतवून लावू शकेल का?

5 second read
0
0
18

no images were found

तेनाली रामा’ मालिकेत विषकन्या आणि तिने राजावर केलेले हल्ले तेनाली परतवून लावू शकेल का?

 

सोनी सबवरील ‘तेनाली रामा’ मालिकेत कृष्ण भारद्वाजने साकारलेल्या तेनालीच्या बुद्धीचातुर्याच्या सुरसरम्य कथा बघताना प्रेक्षक गुंग झाले आहेत. आगामी भागांमध्ये, तेनालीने लैलाचे खरे स्वरूप उघडकीस आणण्याचा चंग बांधलेला दिसेल. ती खतरनाक विषकन्या आहे याची जाणीव मात्र त्याला नाही आहे. तेनाली राज्यातून हरवलेल्या शाही मोहरचा शोध घेत असताना विचित्र घटना घडू लागतात- लैलाचे संशयास्पद वागणे, पर्शियन पत्र हरवणे आणि घातक घटनांची मालिका. त्या पत्रातील छुपा अर्थ जेव्हा तेनाली शोधून काढतो, तेव्हा त्याची भीती खरी असल्याचे त्याच्या लक्षात येते. त्याला समजून चुकते की लैला एक प्रशिक्षित मारेकरी आहे आणि राजा कृष्णदेवरायावर (आदित्य रेडिज) विषप्रयोग करण्यासाठी ती आली आहे. राज्यात रंग पंचमीचा उत्सव सुरू होतो आणि इकडे लैलाचे कुटिल कारस्थान उधळून लावण्यासाठी रामाचे प्रयत्न सुरू होतात.

 

पदोपदी मायावी जाळे पसरलेले असताना तेनाली उशीर होण्याअगोदर राजापर्यंत पोहोचू शकेल का?

 

‘तेनाली रामा’ मालिकेत शीर्षक भूमिका करत असलेला कृष्ण भारद्वाज म्हणतो, “तेनाली आपल्या बुद्धीचातुर्याबद्दल ओळखला जातो, पण यावेळी तो लढा देत आहे, त्यात प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. लैला (पवित्रा पुनिया) ताकदवान आहे त्यामुळे तिच्याशी सुरू असलेला संघर्ष अधिकच रोमांचक होत आहे. रंगपंचमीचे दृश्य करणे आव्हानात्मक होते पण तितकेच आकर्षकही होते. कारण सणासुदीची भव्यता कायम ठेवून आम्हाला आमच्या तीव्र भावना अभिव्यक्त करायच्या होत्या. तो फारच समाधान देणारा अनुभव होता. या खतरनाक परिस्थितीला तोंड देऊन तेनाली कथेतील गूढ कसे उकलतो हे बघायला प्रेक्षकांना नक्की आवडेल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

डीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक ‘ कंपनीमध्ये निवड

डीकेटीईच्या सहा विद्यार्थ्यांची मित्सुबिशी इलेक्ट्रीक ‘ कंपनीमध्ये निवड इचलकरंजी (प्रतिनिध…