Home मनोरंजन जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कलाकार साजरा करत आहेत रंगभूमीपासून पडद्यापर्यंतचा प्रवास!

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कलाकार साजरा करत आहेत रंगभूमीपासून पडद्यापर्यंतचा प्रवास!

2 min read
0
0
29

no images were found

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कलाकार साजरा करत आहेत रंगभूमीपासून पडद्यापर्यंतचा प्रवास!

रंगभूमी दीर्घकाळापासून अनेक प्रख्‍यात कलाकारांसाठी पाया राहिला आहे, त्‍यांच्‍यामधील कला, शिस्‍तबद्धताा आणि पररफॉर्मन्‍सबाबत सखोल माहितीला आकार देत आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीवरून टेलिव्हिजनपर्यंत प्रवास केलेले एण्‍ड टीव्‍ही कलाकार रंगमंचाने त्‍यांना रूपेरी पडद्यासाठी कशाप्रकारे सुसज्‍ज केले, सामना करावी लागलेली आवहाने आणि रंगमंचाचा आजही त्‍यांच्‍या कामावर पडणाऱ्या प्रभावाबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत नीता मोहिंद्रा (कैलाशा बुआ, ‘भीमा’), हिमानी शिवपुरी (कटोरी अम्‍मा, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि रोहिताश्‍व गौड (मनमोहन तिवारी, ‘भाबीजी घर पर है’). मालिका ‘भीमा’मधील नीता मोहिंद्रा ऊर्फ कैलाशा बुआ म्‍हणाल्‍या, ”रंगभूमीसह माझ्या अभिनय प्रवासाला सुरूवात झाली, जेथे मी अभिव्‍यक्‍ती, देहबोली आणि आवाजातील चढ-उताराचे खरे पैलू शिकले. रंगभूमी क्षणामध्‍ये सामावून जाण्‍यास, त्‍वरित जुळून जाण्‍यास आणि प्रबळपणे भावना व्‍यक्‍त करण्‍यास शिकवते. तेथे कोणतेही रिटेक नसतात, अस्‍सल व विनाव्‍यत्‍यय परफॉर्मन्‍सेस सादर करायचे असते. रंगभूमीवरून टेलिव्हिजनपर्यंतचा प्रवास उत्‍साहवर्धक व आव्‍हानात्‍मक होता, कारण माध्‍यमामध्‍ये वेगळी ऊर्जा आणि टेक्निकल अचूकतेची गरज असते. पण, रंगभूमीने माझ्यामध्‍ये बिंबवलेली शिस्‍तबद्धता, सखोलता व सहजता माझ्यासाठी सर्वात मोठ्या मालमत्ता आहेत. मालिका ‘भीमा’मध्‍ये मी माझ्या नकारात्‍मक भूमिकेत रंगभूमीवरील ती प्रखरता आणते, सखोलता व प्रभावाची भर करते. रंगभूमी माझे पहिले प्रेम आहे आणि माझ्या कलेला नवीन आकार देत आहे, तसेच मी साकारणाऱ्या प्रत्‍येक भूमिकेला सर्वोत्तम करत आहे.”

मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मधील हिमानी शिवपुरी ऊर्फ कटोरी अम्‍मा म्‍हणाल्‍या, ”रंगभूमीसह, विशेषत: नॅशनल स्‍कूल ऑफ ड्रामामधील सुरूवातीच्‍या काळामध्‍ये मला अभिनयाची आवड जडली. रंगभूमी माझ्यासाठी सर्वात मोठे गुरू राहिले आहे, परफॉर्मन्‍स, आवाजातील चढ-उतार, शारीरिक अभिव्‍यक्‍ती आणि कथानकथन कलेबाबत माझ्या समजला आकार देत आहे. रंगमंचावर लाइव्‍ह परफॉर्म करण्‍याचा रोमांच अद्वितीय आहे. त्‍यामधून कलाकाराला सहजता, आत्‍मविश्‍वासू असण्‍यासोबत प्रेक्षकांशी संलग्‍न होण्‍याची प्रेरणा मिळते. टेलिव्हिजनवर परफॉर्म करण्‍याचा बदल मोठा होता, या माध्‍यमामध्‍ये बारकाईने निरीक्षण करण्‍याची आणि अभिनयाप्रती उत्तम दृष्टिकोन राखण्‍याची गरज असते, तसेच कॅमेरा समोर असण्‍यासोबत टेक्निकल अडचणीदेखील येतात. पण, रंगभूमीमधील माझा प्रबळ पाया माझ्यासाठी सर्वात मोठी मालमत्ता आहे, ज्‍यामुळे मी सखोलता, वास्‍तविकता आणि नैसर्गिक भावनांसह भूमिकांमध्‍ये सामावून जाते. आजही रंगमंचावर गेल्‍यानंतर माझ्यामध्‍ये आपलेपणाची भावना जागृत होते. रंगभूमी मला प्रेरित करण्‍यासोबत उत्‍साहित करत आहे, कलेप्रती माझी आवड कायम ठेवत आहे आणि टेलिव्हिजनसाठी माझ्या सर्जनशीलतेला चालना देत आहे. माझा प्रवास मला कुठेही घेऊन जावो, रंगभूमीमधील माझे मूळ नेहमी माझ्या जीवनाचा अंतर्गत भाग राहिल.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील रोहिताश्‍व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्‍हणाले, ”मी अनेक वर्षे रंगभूमीवर काम केले आहे, नाटकांमध्‍ये परफॉर्म केले आहे, ज्‍यासाठी वैविध्‍यता, समर्पितता आणि सखोल भावनेची गरज होती. रंगभूमी स्‍वत:ची छाप निर्माण करण्‍यास, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्‍यास आणि भूमिकेला अधिक निपुण करण्‍यास शिकवते. टेलिव्हिजनवर काम करण्‍यास सुरूवात केल्‍यानंतर मला समजले की हे माध्‍यम वेगळे असले तरी परफॉर्मन्‍स करण्‍याची मूलभूत तत्त्वे तीच आहेत. कॉमेडीसाठी टाइमिंग महत्त्वाचे आहे, जे माझ्या रंगभूमी दिवसांदरम्‍यान निपुण झाले. रंगभूमीवरील अनुभव मला मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील माझ्या भूमिकेमध्‍ये वास्‍तविकता आणि नैसर्गिक प्रवाह आणण्‍यास मदत करतो. आजही माझा विश्‍वास आहे की रंगभूमी अभिनयाचे निर्मळ प्रकार आहे आणि मी रंगभूमीवर मिळालेल्‍या शिकवणींना स्क्रिनवरील प्रत्‍येक परफॉर्मन्‍समध्‍ये आणतो.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत बचत

ॲमेझॉन इंडियाची मोठी घोषणा: १२.५ कोटी उत्पादनांवर झिरो रेफरल फी, विक्रेत्यांना ७०% पर्यंत …