Home शासकीय वाहनधारकांनी तात्काळ एचएसअरपी पाटी बसवावी

वाहनधारकांनी तात्काळ एचएसअरपी पाटी बसवावी

10 second read
0
0
29

no images were found

वाहनधारकांनी तात्काळ एचएसअरपी पाटी बसवावी

 

कोल्हापूर : दि. 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना वाहन वितरकाने HSRP बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या वाहनांना एचएसअरपी बसविण्यात आलेली नाही, अशा वाहनधारकांनी तात्काळ संबंधित वाहन वितरकाशी संपर्क साधून वाहनास एचएसअरपी बसवण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

      शासनाकडून दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.31 मार्च 2025 पर्यंत बसविण्याचे निर्देश देण्यात आले होते. आजपर्यंत जुन्या वाहनांना एचएसअरपी बसविण्याचे कामकाज फारच कमी प्रमाणात पुर्ण झाल्याने, परिवहन आयुक्त कार्यालय परिपत्रक दि.20 मार्च 2025 अन्वये दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना एचएसअरपी बसविण्यासाठी दिनांक 30 जून 2025 पर्यंत नव्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

      जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी 25 किंवा 25 पेक्षा जास्त दुचाकी, चारचाकी, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक मालकांनी एचएसअरपी बसविण्यासाठी अर्ज केल्यास त्यांच्या सोयीच्या ठिकाणी किंवा हाऊसिंग सोसायटीमध्ये संबंधित एजन्सी कोणतेही अतिरिक्त होम फिटमेंट शुल्क न अदा करता वाहनांवर एचएसअरपी बसविणार आहे, असेही श्री. भोर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…