Home सामाजिक सतेज कृषी प्रदर्शनास प्रारंभ चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

सतेज कृषी प्रदर्शनास प्रारंभ चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

2 second read
0
0
38

no images were found

 

सतेज कृषी प्रदर्शनास प्रारंभ चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : देश विदेशातील नामांकित कंपन्यांचा सहभाग व शेतकऱ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सतेज कृषी प्रदर्शनास प्रारंभ झाला असून या प्रदर्शनाचे उदघाटन प्रगतशील शेतीतज्ञ प्रताप चिपळूणकर यांच्या शुभहस्ते फित कापून झाले. शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक माहिती या माध्यमातून मिळवण्याची संधी उपलब्ध करण्यात आली असून त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, श्रीमती आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील, दुधगंगा साखर कारखान्याचे चेअरमन माजी आम. के. पी. पाटील,तेजस सतेज पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी.पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार सहसंपर्कप्रमुख विजय देवणे आर.के. पोवार, गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे,माजी अध्यक्ष विश्वास पाटील, गोकुळ संचालक बाबासो चौगले, बयाजी शेळके, अजित नरके, माजी नगरसेवक राजू लाटकर, शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण, सुनिल मोदी, बिद्री संचालक राजेंद्र मोरे, संभाजी पाटील, आर. एस. कांबळे, विनोद पाटील, धीरज पाटील, सत्यजित भोसले, स्वप्निल सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य “सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन’तपोवन मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. याचा आज शानदार प्रारंभ झाला.

यावेळी बोलताना आम सतेज पाटील यांनी सांगीतले की, सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षापासून विविध शेती विषयक माहिती देण्याचा प्रयत्न झालेला आहे. यावर्षीचे पाचवे प्रदर्शन असून आयोजित केलेले प्रदर्शन नवनवीन विकसित तंत्रज्ञान घेऊन शेतकऱ्यांसमोर आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसाय कमी खर्चात कसा करावा, शेती कशी करावी याविषयीचे मार्गदर्शन या प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे. शाश्वत पद्धतीने शेती कशी करावी याचेही मार्गदर्शन शेतकऱ्यांना होणार आहे असे आमदार पाटील यांनी सांगितले.
शेतीतज्ञ प्रताप चिपळूणकर म्हणाले विकसित तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. दर्जेदार उत्पादन केलेल्या कंपन्यांची मशिनरींची माहिती सतेज कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. याचा फायदा उत्पादन वाढीसाठी व किफायतशीर शेतीसाठी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आजचे व्याख्यान
श्री. मंगेश किसन भास्कर यांचे नैसर्गिक शेती (दहा ड्रम तंत्रज्ञान) या विषयावर तर
डॉ. नरेंद्रकुमार जे. सुर्यवंशी यांचे फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर तर डॉ. परिक्षीत देशमुख यांचे दुग्धव्यवसायात जीनोमिक सेक्ससेल सिमेनचे महत्व या विषयावर व्याख्याने होणार आहेत.
प्रदर्शनात तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, २५० स्टॉल, कृषी कंपन्यांचा सहभाग, पशु-पक्ष्यांचा सहभाग, शेती विषयक तज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बि-बियाणे खते आदींची माहिती, फुलांचे प्रदर्शन व विक्री (पुष्पप्रदर्शन) विविध सांस्कृतिक कार्यक्रम व बचत गटांचे मोफत स्टॉल उपलब्ध आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी द्यावा, खासदार धनंजय महाडिक यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर.पाटील यांना निवेदन

  जलजीवन मिशन कोल्हापूर जिल्हयात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी उर्वरीत ६७ गावांना निधी…