Home उद्योग मॅक्स फॅशनचे लॅक्मे फॅशन वीकमध्ये दणक्यात पदार्पण, कल्की कोचलीनने वाढवली रनवेची शोभा

मॅक्स फॅशनचे लॅक्मे फॅशन वीकमध्ये दणक्यात पदार्पण, कल्की कोचलीनने वाढवली रनवेची शोभा

10 second read
0
0
19

no images were found

मॅक्स फॅशनचे लॅक्मे फॅशन वीकमध्ये दणक्यात पदार्पण, कल्की कोचलीनने वाढवली रनवेची शोभा

मुंबई, – मॅक्स फॅशनने लॅक्मे फॅशन वीकx एफडीसीआयच्या २५ व्या पर्वात मोठ्या दिमाखात आणि नवे बदल घडवत पदार्पण केले आहे. या ब्रँडचा चेहरा असलेल्या कल्की कोचलीन यांच्यासोबत हे पदार्पण करण्यात आले. या घटनेमुळे भारतीय फॅशन जगतात फार महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. देशातील सर्वात मानाच्या रनवेवर मॅक्सने हाय-स्ट्रीट स्टाईलचे एक नवे रूप सादर केले. हे फक्त रनवेवरील पदार्पण नव्हते. ही एक सांस्कृतिक घडामोड होती. हा एक विचार होता… जागतिक फॅशन सगळ्यांसाठी असते, सर्वांना उपलब्ध, ट्रेंडप्रमाणे चालणारी आणि सहज करता येईल अशी स्टाईल यात नावाजण्यात येत आहे. मॅक्स फॅशनने सिसिलियन समर आणि अमाल्फी एस्केप कलेक्शन सादर करून हाय स्ट्रीट फॅशनला एक नवे स्वरूप दिले आहेच. पण त्याचबरोबर लाखो ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा त्यांच्या कवेत आणून सर्वांसाठी समान संधीही निर्माण केली आहे.

रनवेवर पहिल्या मॉडेलने पाऊल ठेवल्यापासूनच हे सगळ्यांच्या लक्षात आले की हे फक्त आणखी एक नवे कलेक्शन नाही, हा एक क्षण आहे. हे कलेक्शन पाहून प्रेक्षकांचा श्वास रोखला गेला, सगळीकडून कौतुकाचे, उत्साहाचे स्वर घुमू लाग्ले आणि या जल्लोषात कल्की कोचलीन यांनी रनवेवर प्रवेश केला. आत्मविश्वास, बंडखोर वृत्ती आणि सहजसुंदर स्टाईल दाखवणाऱ्या कपड्यांतील कल्की फक्त रनवेवर चालल्या नाहीत, जणू त्या परिसराच्या त्या अनभिषिक्त सम्राज्ञी होत्या. कोणतीही अवास्तव सजावट नाही, भव्यदिव्य काही नाही… फक्त अस्सल, भक्कम अस्तित्व त्यांनी दाखवून दिले. हा क्षण फॅशनची नवी व्याख्या करणारा होता, हा क्षण बदलाचा होता. प्रत्येक पावलातून तुमची एक नवी ओळख समोर येत होती, तुमच्या या नव्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्यासाठी हा क्षण जगाला आमंत्रण देत होता.

       IYKYDK या लोकप्रिय गाण्यासह रॅपर्स इरफाना आणि एमसी पांडा यांनी अत्यंत उत्साहजनक परफॉर्मन्सने रनवेला झळाळून टाकले. या कलेक्शनमधील बंडखोर तरीही सहजसुंदर स्टाइलचे तत्व त्यामुळे पुन्हा अधोरेखित झाले. सिसिलियन समर प्रेक्षकांसमोर आल्यानंतर तिथे एक वेगळाच उत्साह संचारला. ठळक रंग, क्लासिक प्रिंट्स आणि हवेशीर कपड्यांच्या उन्हाळी फॅशनने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या कलेक्शनने शहरी काटेकोरपणा आणि किनारी भागातील चार्म यांच्यातील अंतर धुसर करत हवेशीर फ्लोइंग ड्रेस, सहजपणे स्टाइल जपणारे ऑफ शोल्डर टॉप्स आणि अत्यंत स्टायलिश को-ऑर्ड सेट्समधून उन्हाळ्यातील सौंदर्याची नवी व्याख्या मांडली.

त्यानंतर वातावरण एकदम बदलले. नवे काहीतरी येत असल्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये ताणली गेली. अमाल्फी एस्केप कलेक्शन मेडिटेरिअन भागाची वैशिष्ट्ये घेऊन सादर झाले आणि हा रनवे जणू पुन्हा जिवंत झाला. आरामदायी सौंदर्य आणि आधुनिक प्रवासाचे सत्व जपणारे हे कलेक्शन आहे. सन-किस्ड न्युट्रल्स, मऊशार लिनन आणि प्रसन्न  टेराकोटाचे विविध रंग यामुळे रनवे एका सुंदर अभिजात सौंदर्यात न्हाऊन निघाला. रिसॉर्ट वेअरमधील हे सर्वोत्कृष्ट कलेक्शन आहे. यात मोकळेढाकळे रफल ड्रेसेस, खास तयार केलेले को-ऑर्ड्स आणि लिननचा वापर असलेले मेन्सवेअर खास आधुनिक काळातील प्रवासी वृत्तीच्या लोकांसाठी तयार करण्यात आले आहेत. हे कलेक्शन पाहून सारेच प्रेक्षक- संपादक, इन्फ्लुएन्सर्स, उद्योगक्षेत्रातील नेतृत्व असे सारेच सरसावून बसले. फोनचे कॅमेरे सज्ज झाले, कुजबुज आता कौतुकात बदलली आणि टाळ्यांचा कडकडाट वाढत गेला. हे फक्त पदार्पण नव्हते, हा एक मोठा बदल होता.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्रत्येकी १० हजाराचं बक्षीस प्रदान

  ७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्…