Home आरोग्य सह्याद्रि हॉस्पिटल्सची कराडमध्ये मिशन प्रेरणा सुरू करण्याची घोषणा 

सह्याद्रि हॉस्पिटल्सची कराडमध्ये मिशन प्रेरणा सुरू करण्याची घोषणा 

17 second read
0
0
49

no images were found

सह्याद्रि हॉस्पिटल्सची कराडमध्ये मिशन प्रेरणा सुरू करण्याची घोषणा 

कराड, महाराष्ट्र – सह्याद्रि हॉस्पिटल्सने, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराड येथे मिशन प्रेरणा सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा महत्वाकांक्षी उपक्रम, कराडमध्ये पहिल्यांदाच राबविला जात आहे, जो गरीब बालकांसाठी बालरोग शस्त्रक्रिया प्रदान करण्यावर केंद्रित आहे. पुणे प्रिस्टाइन रोटरी क्लब आणि बजाज फायनान्स यांच्या सहयोगाने समर्थित असलेल्या मिशन प्रेरणेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील उच्चस्तरीय बालरोग देखभाल अधिक सुलभ आणि प्रवेश्य बनवण्याचा हेतू आहे.

फक्त दोन महिन्यांच्या आत, या उपक्रमांतर्गत ११४ पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. यावरून  अशा उपक्रमांची समाजात किती तीव्र गरज आहे याची कल्पना येऊ शकते. या उपक्रमाचा लाभ घेणार्‍यांमध्ये एक ३.५ वर्षांचा बालक आहे, ज्याच्यावर कराडमध्ये पहिली कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया झाली. सदर शस्त्रक्रियेमुळे त्या बालकाला प्रथमच ऐकण्याची संधी मिळाली.  अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमुळे केवळ एक जीवनच वाचत नाही तर संपूर्ण कुटुंबाला नवीन आशेचा किरण मिळतो.

       डॉ. सुधीन आपटे, चार्टर प्रेसिडेंट आणि ट्रस्टी आणि कन्व्हेनर, मिशन मुस्कान, म्हणाले, “रोग प्रतिबंधन व सुश्रुषा हे रोटरीचे एक महत्वाचे ध्येय आहे. त्यानुसार रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिन हे कायमच वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. कॅन्सर सेवा व इतर गंभीर आजारांसाठी वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि रूग्णांना आर्थिक मदत ह्यावर रोटरी प्रिस्टिन चा विशेष भर आहे. लहान मुलांच्या शस्त्रक्रिया – विशेषत: हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर उपचार, अवयव रोपण – ह्यावर आम्ही कायमच काम करतो. सातारा जिल्ह्यात आम्ही प्रथमच मोठ्या प्रमाणावर हा प्रकल्प राबवला. गेल्या पाच-सहा महिन्यात आम्ही 125 हून अधिक लहान मुलांच्या शस्त्रक्रियांना आर्थिक मदत केली. त्यात सह्याद्री-कराडचा महत्वाचा वाटा आहे. येथे अवघड आणि लहान बालकांचे प्राण वाचवणाऱ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आमचे शंभरहून अधिक बालकांना नवजीवन संजीवनी द्यायच्या उद्दीष्टात सह्याद्री – कराडने महत्वाची भुमिका पार पाडली. त्याबद्दल रोटरी प्रिस्टिन त्यांचे आभारी आहे”

      श्री. सचिन कुलकर्णी, उपाध्यक्ष – ग्राहक अनुभव, सह्याद्रि हॉस्पिटल्स, म्हणाले, “रुग्णांची निवड अनेक ठिकाणी घेण्यात आलेल्या संपूर्ण तपासणी शिबिरांद्वारे केली जाते. अशा तपासणी दरम्यान गंभीर परिस्थितीतील बालरोगांच्या उपचारावर लक्ष केंद्रित केले जाते. मिशन प्रेरणाच्या आर्थिक मॉडेलमुळे रुग्णाच्या उपचार आणि शस्त्रक्रिया यांच्या खर्चाचा मोठा वाटा उपक्रमांतर्गत केला जातो. यामुळे सहभागी कुटुंबांवरील आर्थिक ओझे बऱ्याच प्रमाणात कमी होते.”

मा. दिलीप भाऊ चव्हाण, संचालक सह्याद्री सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल कराड, यांनी या उपक्रमाच्या सामाजिक प्रभावावर प्रकाश टाकला, “मिशन प्रेरणामुळे आम्ही श्रेष्ठ वैद्यकीय संसाधने आणि सामुदायिक प्रयत्न यांची एकत्रित सांगड घालून रुग्णांमध्ये अमूलाग्र बदल घडवणार्‍या शस्त्रक्रिया केल्या. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांमुळे समाजातील अनेक तरुणांना उज्ज्वल भविष्याची आशा मिळाली. हा केवळ एक वैद्यकीय उपक्रम नसून हा बालकांच्या आणि त्यांच्या कुटुंबांच्या जीवनातील बदलांचा प्रवास आहे. या उपक्रमामुळे त्यांना जगाला नव्याने सामोरे जाण्यासाठी लागणारी आवश्यक देखभाल आणि पाठिंबा मिळतो या उपक्रमाला स्थानिक आरोग्य प्रशासनांचा आणि समवेदना सारख्या एनजीओंचा चांगला आणि मजबूत पाठिंबा आहे, जे गरजू रुग्णांना ओळखून त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत करतात. नजीकच्या भविष्यात सातारा, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये मिशन प्रेरणाचे काम नेण्याचा आमचा आहे.”

    सह्याद्रि हॉस्पिटल्स पुढील काळातही हा उपक्रम वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे, यात समुदाय आणि भागीदारांचा पाठिंबा महत्वाचा आहे. ह्या उपक्रमाचे यश हे सगळ्यांच्या सहकाऱ्यामुळे आलेले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्रत्येकी १० हजाराचं बक्षीस प्रदान

  ७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्…