Home Video डीकेटीईच्या मुलांचा खो खो संघ राष्ट्रीय स्तरावरील सीओईपी, पुणे येथील स्पर्धेत विजयी

डीकेटीईच्या मुलांचा खो खो संघ राष्ट्रीय स्तरावरील सीओईपी, पुणे येथील स्पर्धेत विजयी

22 second read
0
0
79

no images were found

डीकेटीईच्या मुलांचा खो खो संघ राष्ट्रीय स्तरावरील सीओईपी, पुणे येथील स्पर्धेत विजयी

इचलकरंजी (प्रतिनिधी):-डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टियूटच्या मुलांच्या खो खो संघाने विजयी घौडदौड कायम ठेवत इचलकरंजी येथे पार पडलेल्या लीड कॉलेजची खो खो स्पर्धा जिंकणा-या मुलांच्या संघाने राष्ट्रीय स्तरावरील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथे संपन्न झालेली झेस्ट -२५ ही खो खो स्पर्धा जिंकली आहे यामुळे डीकेटीईच्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

      कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पुणे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील खो खो स्पर्धेत डी.वाय.पाटील, पुणे कॉलेज च्या संघावरती मात करीत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमाकांचे बक्षिस संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी डीकेटीईकडून वेळोवेळी प्रोत्साहन देण्यात येते यामुळेच येथील विद्यार्थी अशा स्पर्धेमध्ये विविध कला गुणांचे सादरीकरण करुण आपला ठसा अशा स्पर्धेमध्ये उमटवतात यामुळेच इचलकरंजी आणि डीकेटीईचे नांव अशा विविध स्पर्धेमध्ये सन्मानाने घेतले जाते.

      विजयी खेळाडूंचे नांवे यश देसाई, चैतन्य माने, सचिन चव्हाण, आदित्य बुक्का, अभिषेक पाटील, तेजस सोनवणे, अदित्य दरेकर, ओंकार परब, निलेश पुजारी, वैष्णव पाटील, सतेज मांगलेकर, सौरभ बेडक्याळे, वैभव पाटील, अभिषेक चौगुले, संदेश पाटील.

       विजयी संघास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व सचिव डॉ सपना आवाडे यांच्या प्रमुख उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालिका प्रा. डॉ. एल.एस. आडमुठे, स्पोर्टस इनचार्ज  ओंकार खानाज उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्रत्येकी १० हजाराचं बक्षीस प्रदान

  ७२ व्या राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेतील १२ खेळाडूंना खासदार महाडिक यांच्याकडून प्…