no images were found
ॲमवेने भारतभरातील चार संशोधन व विकास प्रयोगशाळांमध्ये $4 मिलियन गुंतवले आहेत
कोल्हापुर: वैज्ञानिक क्षमता सशक्त बनविणे वरआपले लक्ष केंद्रित करीत, जेणेकरून आरोग्य आणि कल्याणात अत्याधुनिक, पुढील पिढी समर्थन प्रदान करता येईल, ॲमवे ही आरोग्य व कल्याणास समर्थन प्रदान करणाऱ्या एका जागतिक कंपनीच्या रूपात, आज भारतभरात आपल्या चार अत्याधुनिक संशोधन आणि विकास प्रयोगशाळांची (आर अँड डी लॅब्सची) औपचारिक सुरुवात केली आहे व त्यासाठी $4 मिलियनची1 गुंतवणूक केलेली आहे.प्रगत तंत्रज्ञान, सद्यःकालीन विज्ञान आणि वैज्ञानिक विचारांचे नेतृत्व यांचा वापर करून, या प्रयोगशाळा उद्योगाच्या मानकांना पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज आहेत आणि हे सुरक्षित, प्रभावी, भिन्न आणि उच्च-गुणवत्तेची आरोग्य आणि कल्याण उत्पादने विकसित करून केले जाणार आहे. यात भारतातील व जगभरातील लोकांच्या आरोग्य आणि कल्याणास समर्थन देण्याचे उद्देश ठेवले गेले आहे. हे जगभरातील चार ॲमवे संशोधन आणि विकास केंद्रांपैकी (आर अँड डी हब्सपैकी) एक आहे आणि पोषण विज्ञानावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करत आहे. ग्राहकांच्या वाढत्या आरोग्य आणि कल्याणाच्या गरजा पूर्ण करण्याच्या ॲमवेच्या प्रयत्नांच्या अनुषंगाने हे धोरणात्मक पाऊल उचलण्यात आले आहे आणि इष्टतम कल्याण प्राप्त करण्यासाठी व सर्वांसाठी आरोग्यदायी भविष्यास प्रोत्साहन देण्यासाठी कोट्यवधी लोकांना शक्ती प्रदान करत आहे.
गुरुग्राम, चेन्नई, बंगळुरू आणि डिंडीगुळ येथील ॲमवेच्या चार अत्याधुनिक संशोधन आणि विकास प्रयोगशाळांमध्ये 24,700 चौरस फूट क्षेत्र आहे, जे वैज्ञानिक शोध आणि महत्वपूर्ण शोध उत्पादन विकासाचे पॉवरहाऊस तयार करते.
रजनीश चोपड़ा, व्यवस्थापकीय संचालक, ॲमवे इंडिया, हे ॲमवे इंडियाच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून या गुंतवणुकीविषयी बोलताना म्हणाले की, “भारतात आरोग्याच्या परिदृश्यात पोषण, जीवनशैली आणि आतड्याच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण आव्हाने समोर उभी असल्याने पोषण व निरोगीपणा यांच्यासाठी परिवर्तनशील दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. ही गुंतवणूक ॲमवे इंडियाची उत्पादन विकास क्षमता वाढवते आणि ॲमवेला अशा स्थितीत आणून ठेवते जेणेकरून तिला भारतातील व जगभरातील ग्राहकांच्या व व्यवसायांच्या अद्वितीय आणि विकसनशील गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील. जागतिक स्तरावर भारत आमची सर्वोच्च प्राधान्य बाजारपेठेच्या रूपात असून ही गुंतवणूक ॲमवे ग्लोबलचा देशाच्या कौशल्यावर आणि आरोग्य व कल्याण क्षेत्रात अभूतपूर्व नवउपक्रम राबविण्याच्या क्षमतेवर असलेला विश्वास ठळक करून दाखवत आहे.”
“सव्वाशे वर्षांहून अधिक काळ, ॲमवे इंडियाने लोकांचा विश्वास संपादन केला आहे आणि हे तिने लोकांना आरोग्यदायी आयुष्य जगण्यास मदत करून साध्य केलेले आहे. आरोग्यदायी राष्ट्राप्रती आमची बांधिलकी आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राधान्य देऊन कोट्यवधी भारतीयांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्यास मदत करण्यासाठी आमच्या वितरकांना सक्षम बनविण्याची कल्पना आहे. आम्ही गरजेवर आधारित शिफारसी देण्यासाठी नवउपक्रम राबविणे सुरू ठेवत आहोत आणि अशा वेळेस आम्हाला असे आढळले आहे की आपल्या आरोग्य आणि कल्याण प्रवासातील सर्वात महत्वाचा घटक आहे एक मजबूत आतडे जे सुधारित मानसिक आरोग्य आणि प्रतिकारशक्ती यांच्याशी सुद्धा जोडलेले आहे. ‘मॉर्निंग न्यूट्रिशन’ ही आरोग्यदायी जीवनशैलीस समर्थन पुरविणारी एक समग्र मोहीम आहे जी व्यक्तींना इष्टतम पोषण घेऊन त्यांच्या दिवसाची सुरुवात करण्यास मदत करते. यामुळे त्यांना आरोग्यदायी जीवनशैली राखता येते. ‘मॉर्निंग न्यूट्रिशन’ सारख्या वैज्ञानिकदृष्ट्या समर्थित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी संशोधन आणि विकास प्रयोगशाळा (आर अँड डी लॅब्स) आणखी मदत करतील. आम्ही सर्वांसाठी एक आरोग्यदायी भविष्य घडवण्याकरिता तयार आहोत आणि हे भारत सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. ही धोरणात्मक गुंतवणूक आपले ध्येय साध्य करण्याचा आमचा आत्मविश्वास दृढ करत आहे आणि त्याच वेळेस आरोग्य व कल्याण उद्योगात आमचे स्थान भक्कम करत आहे, असे चोप्रा म्हणाले.”
भारतात संशोधन आणि विकास प्रयोगशाळांची सुरुवात करताना ॲमवेचे इनोव्हेशन अँड सायन्स, भारत आणि दक्षिण पूर्व आशिया मार्केट्सचे संचालक डॉ. श्याम रामकृष्णन म्हणाले, “जगभरात आरोग्य, कल्याण आणि पोषण यांच्याविषयी वाढत्या जागरुकतेला प्रतिसाद म्हणून, अत्याधुनिक संशोधन आणि विकास प्रयोगशाळांमधील ही गुंतवणूक जागतिक बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे एकूण कल्याणासाठी सातत्याने शिफारसी प्रदान करण्याच्या आमच्या जागतिक बहुवार्षिक वाढीच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असून विविध वयोगटांच्या बदलत्या गरजेनुसार शिफारशी तयार केल्या जात आहेत.”
भारतात आमचा एक इनोव्हेशन हब आहे आणि हे आम्हाला येथील अभिजात गुणांच्या साठ्याचा (टॅलेंट पूलचा) वापर करण्यास व संपूर्ण कल्याणासाठी अर्थपूर्ण व महत्त्वपूर्ण योगदान देण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला समर्थन देण्यास अनुकूल बनवत आहे. सहा दशकांहून अधिक काळ, ॲमवेमध्ये, आम्ही नेहमीच उत्पादन विकासासाठी विज्ञानावर आधारित दृष्टिकोनास प्राधान्य दिलेले आहे आणि आमच्या वितरकांसाठी व त्यांच्या ग्राहकांसाठी सातत्याने नवउपक्रम राबविलेले आहेत. आम्ही भारतातील आणि जगभरातील शीर्ष अभिजात गुणांचा (टॉप टॅलेंटचा) फायदा उचलून भिन्न पोषण, अन्न आणि सौंदर्य उत्पादने विकसित करत आहोत. ही उत्पादने भारत आणि साऊथ ईस्ट आशिया वर आणि शक्यतो इतर जागतिक बाजारपेठांसाठी केंद्रित आहेत. लोकांना अधिक चांगले, आरोग्यदायी आयुष्य घालविण्यास मदत करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी सुसंगत, हे पाऊल नवउपक्रमाची पातळी उंचावेल, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांना अग्रस्थानी ठेवेल आणि अशा प्रकारे महत्वाकांक्षी, कल निश्चित करणारी (ट्रेंडसेटिंग) उत्पादने आणि उपाय यांच्या माध्यमातून द्वारे ॲमवेला भविष्यासाठी तयार बनविण्याची आमची वचनबद्धता दर्शवेल, असे मी मानतो.”