no images were found
मतदान केंद्रांची संख्या वाढवून मतदार यादीतील त्रुटी दूर करा : भाजपाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
कोल्हापूर(प्रतिनिधी) :सामान्यपणे, मतदान केंद्र म्हणजे मतदाराला जेथे जाऊन मतदान करावे लागते ती जागा असते. मतदान केंद्रांची निश्चिती निवडणूक अधिकारी करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळी नेमून दिलेली मतदान केंद्रे असतात. साधारणपणे हे बघण्यात येते कि मतदारास त्याचे नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोचण्यास त्रास होऊ नये व हे अंतर त्यांचे साधारण निवासस्थानापासून लांब असू नये. याच अनुषंगाने २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभेत एकूण ३११ बूथ येतात. उत्तर विधानसभेतील अनेक बुथवर एक हजार पेक्षा जास्त मतदार आहेत. याच बरोबर ८५ वयोगटावरील मतदारांची संख्या ५२६६ असून दिव्यांग २५०० मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे सूचित केले असून सुद्धा अनेक बुथवर मतदारांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. याच संदर्भात आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने उत्तर विधानसभेमध्ये येणाऱ्या मतदान केंद्राची संख्या वाढवावी व मतदारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या, एका बूथ मध्ये एक हजार पेक्षा जास्त मतदार असतात त्या ठिकाणी मतदारांची दिवसभर मतदान करण्यासाठीची वर्दळ चालू असते हि वर्दळ पाहून अनेक नागरिक मतदान करणे टाळतात. त्यासाठी एका बूथमध्ये एक हजार पेक्षा जास्त मतदार असू नयेत तसेच एका मतदान केंद्रामध्ये ६ ते १० बूथ असतील तर त्याठिकाणची मतदारांची संख्या हि अधिक असते. मतदार यादीतील काही चुकांमुळे मतदार संभ्रम अवस्थेत केंद्रा बाहेर घुटमळत राहतो, त्यामुळे गर्दी होताना आढळून येते. तरी त्या भागातील इतर महानगरपालिका, खाजगी शाळेच्या ठिकाणी मतदान केंद्र स्थापित झाले तर नागरिकांना मतदान करणे सोपे जाईल. तसेच एका मतदान केंद्रावर सहाच्या वर बूथ नसावेत. एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे वेगवेगळ्या मतदार यादीमध्ये असतात ती नावे सुद्धा एकाच मतदान केंद्रामध्ये यावीत, स्थलांतरीत झालेली नावे मतदार यादीतून रद्द करण्यात यावीत अशा मागण्यात करण्यात आल्या.
यावेळी सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन, हेमंत आराध्ये, चंद्रकांत घाटगे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, संगीता खाडे, संतोष भिवटे, रोहित पोवार, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, सुधीर देसाई, गिरीष साळोखे, अनिल कामत, सतीश आंबर्डेकर, किसन खोत, रविकिरण गवळी, प्रवीणचंद्र शिंदे, महादेव बिरंजे ई. पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.