no images were found
‘ध्रुव तारा’ या मालिकेच्या कलाकारसंचात एक कठोर कुटुंब प्रमुख म्हणून ध्रुवच्या वडीलांच्या भूमिकेत पंकज धीर सामील
सोनी सब वरील,‘ध्रुव तारा- समय सदी से परे’ ही एक प्रेम आणि काल-प्रवासाची मनोरंजक कथा आहे. महाराणी तारा(रिया शर्मा) आणि तिचा भाऊ महावीर(कृष्णा भारद्वाज) यांच्यातील जबरदस्त नाट्याचा शेवट, ध्रुव(ईशान धवन) आणि ताराच्या 17व्या शतकातून सुटकेने होतो. तथापि, मॅट्रिक्स मधील त्रुटीमुळे ते 19व्या शतकात फेकले जातात, जिथे ध्रुव आणि तारा म्हणूनते वेगळ्या युगात पुन्हा एकदा जन्म घेतात. नंतर कथा 20 वर्षे पुढे सरकते, आणि नव्या व्यक्तिरेखांसह नवे कथानक घेऊन येते.
ध्रुव-तारा यांच्या प्रेमकथेचा नवीन अध्याय उलगडत असताना, त्यांच्यासोबत नवे कलाकार आणि व्यक्तिरेखा सामील होतात. त्यातील एक म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता पंकज धीर, जो ध्रुवचे वडिल, गिरीराज यांची भूमिका साकारणार आहे. नियमांचे कठोर पालनकरणारा अशी ओळख असणारा गिरीराजहा एक कठोर आणि वक्तशीर माणूस आहे. तो आळशी आणि बंडखोर अशा त्याच्या धाकट्या मुलाच्या, ध्रुवच्या अगदी विरुद्ध आहे. त्यामुळे या बापलेकामध्ये भांडणे होत राहतात.
गिरीराजची भूमिका साकारणारा पंकज धीर म्हणतो, “19व्या शतकातील माझा खास अभिजात लुक मला आवडत आहे. एक अभिनेता म्हणून, नव्या भूमिकांसह प्रयोग करणे नेहमीच रोमांचक आणि आव्हानात्मक असते, गिरीराज म्हणून प्रेक्षकांसमोर येण्यास मी उत्सुक आहे. त्याची शिस्त आणि नियम यामुळे बंडखोर स्वभावाचा त्याचा मुलगा ध्रुव आणि त्याच्यामध्ये तणाव निर्माण होतात. 19व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या बाप-लेकाच्या नात्यातील गुंतागुंतीचा शोध घेऊन ही व्यक्तिरेखा साकारताना मी रोमांचित झालो आहे”.