no images were found
वॉर्डविझार्ड फूड्सचा नवीन उत्पादनासह खाद्य खुराक २०२३ मध्ये यशस्वी सहभाग
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गुजरातमधील गांधीनगर येथे खाद्य खुराक २०२३ या भव्य कार्यक्रमात वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडने आपल्या विस्तारीत आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांच्या श्रेणींचे उद्घाटन करून; बीटूबी ग्राहक (बिझनेस टु बिझनेस), निर्यात करणारे ग्राहक, बीटूसी ग्राहक (बिझनेस टु कन्झ्यूमर) अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांना आकर्षित करून आणि खाद्य पदार्थ व पाककृतींच्या क्षेत्रात एक कायमस्वरूपी ठसा उमटवून लक्षणीय प्रभाव पाडला आहे.
खुराक’ हे उत्पादक व पुरवठादार या दोघांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे. हा कार्यक्रम अन्न प्रक्रिया, यंत्रसामुग्री, उपकरणे आणि तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित अत्याधुनिक उत्पादने, नवीन विकसित झालेले तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील विविध कल (ट्रेंड) यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक महत्त्वाचे प्रेरक बनले आहे.
‘खाद्य खुराक’ हे भारतीय खाद्य आणि आतिथ्य या उद्योग क्षेत्रांतील बदल आणि प्रगतीचा आढावा घेणारे साधन आणि नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणण्याचे खास व्यासपीठ बनले आहे. येथे दरवर्षी नवनवीन व कल्पक अशा उत्पादनांचे अनावरण होते. ५००० पेक्षा जास्त ब्रॅंड्स खाद्यखुराक मध्ये त्यांच्या उत्पादनांचे आणि सेवांचे प्रदर्शन करत असून येथे आतापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी भेट दिली आहे.
वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका शीतल भालेराव म्हणाल्या, खाद्य खुराक २०२३’ मधील आमचा सहभाग खरोखरच उल्लेखनीय राहिला. खाद्य खुराकमधील मागच्या वर्षीच्या आमच्या यशस्वी सहभागाच्या पायावर आता या वर्षी खाद्य खुराक २३ ने आमच्या नवीन वाढीव उत्पादनांच्या श्रेणींचे उद्घाटन करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ म्हणून काम केले. भविष्यातही आमच्या ग्राहकांसाठी नवनवीन व कल्पक खाद्य पदार्थ आणण्याच्या आमच्या प्रयत्नांना या कार्यक्रमाने एक नवीन वाट मोकळी करून दिली असून पाककलेतील अनुभवांना नव्याने मांडण्याच्या आमच्या वचनबद्धतेला पुष्टी देण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करेल. भविष्यातही आम्ही आमच्या ग्राहकांसाठी खाद्य व पेय पदार्थ आणि अन्न प्रक्रिया या उद्योग क्षेत्रात नाविन्य, कल्पकता, ग्राहकांचे समाधान, विविधता आणि शाश्वतता आणि उत्कृष्टता आणण्याचे आमचे अथक प्रयत्न असेच कायम ठेवू.”
गतिशील अशा या खाद्य व पेय उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट दर्जाची उत्पादने वितरित करण्यासाठी, नाविन्य व कल्पकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि दीर्घकालीन भागीदारीचे जतन करण्यासाठी समर्पित असणाऱ्या वॉर्डविझार्ड फूड्स अँड बेव्हरेजेस लिमिटेडने खाद्य खुराक २०२३ मधील उत्तुंग यश आणि उत्साही सहभाग यामुळे एक उदयोन्मुख अग्रणी म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे.