
no images were found
23 वे झी सिने अॅवॉर्ड्स 2025: सिनेमाच्या गौरवाचा उत्सव, कार्तिक आर्यनने अनावरण केले फॅन्टरटेनमेंट संकल्पनेचे!
~ तमन्ना भाटिया, वाणी कपूर आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी निर्माण केला चाहत्यांचा जबरदस्त उत्साह, तर नव्याने बनवण्यात आलेल्या पुरस्काराचे करण्यात आले अनावरण~
दोन दर्शकांपेक्षा अधिक काळापासून झी सिने अॅवॉर्ड्स हे सिनेमॅटिक सर्वोत्कृष्टतेचे प्रतीक राहिले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम प्रतिभांचा सन्मान करत आणि जागतिक स्तरावर सिनेमाच्या जादूचा उत्सव साजरा करत या पुरस्कारांनी मनोरंजनाच्या क्षेत्रात नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. अविस्मरणीय परफॉर्मन्सेसपासून ते बॉलीवूडच्या समृद्ध वारशाचा महत्त्वाचा भाग बनण्यापर्यंत हे पुरस्कार विश्वासार्हता आणि लोकप्रियतेचा परिपूर्ण मिलाफ आहेत. हे पुरस्कार केवळ प्रतिभेचाच सन्मान नव्हे, तर प्रेक्षकांच्या पसंतीचाही आनंद साजरा करतात.
झगमगाट, ग्लॅमर आणि पुरस्कारांच्या पलीकडे खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीला पुढे नेणारी ताकद म्हणजे चाहत्यांचे प्रेम आणि पाठिंबा. ते सर्वात मोठ्याने चीयर करतात, मनापासून आनंद साजरा करतात आणि आपल्या आवडत्या कलाकारांसोबत प्रत्येक यश आणि अपयशात उभे राहतात. या वर्षी झी सिने अॅवॉर्ड्स 2025 आणखी मोठ्या स्तरावर आयोजित केले जाणार असून ते चाहत्यांच्या या निष्ठेला अनोख्या ‘फॅन्टरटेनमेंट’ या संकल्पनेच्या माध्यमातून सलाम करतील. प्रथमच बॉलीवूडमधील सितारे आपल्या सर्वात मोठ्या चाहत्यांना प्रकाशाच्या झोतात आणतील आणि चित्रपट व चाहत्यांमधील या अतूट नात्याचा उत्सव साजरा करतील!
या भव्य सोहळ्याची सुरुवात पत्रकार परिषदेमध्ये शानदार पद्धतीने झाली, जिथे 23वे झी सिने अॅवॉर्ड्स 2025 मध्ये यंदाच्या खास संकल्पनेला साजेशा नवीन चषकाचे डिजाइन सादर करण्यात आले. बॉलीवूडचा ‘रूह बाबा’ कार्तिक आर्यन, झीचे मान्यवर आणि भागीदार यांच्या उपस्थितीत या नवीन चषकाचे अनावरण करण्यात आले. या चषकामध्ये एकमेकांत गुंफलेल्या दोन हातांनी हृदय तयार करण्यात आले आहे— त्यातील एक हात चित्रपटसृष्टीचे तर दुसरा हात चाहत्यांच्या अमर प्रेमाचे प्रतीक आहे. हे डिजाइन सिनेमा आणि त्याच्या सर्वात मोठ्या समर्थकांमधील – त्याच्या चाहत्यांमधील भावनिक नात्याचे प्रतिनिधित्व करते. या वर्षीची झी सिने अवॉर्ड्सची आवृत्ती आतापर्यंतच्या पुरस्कारांपेक्षा वेगळी असेल! प्रेक्षकांसोबतचे नाते अधिक दृढ करत हा सोहळा बॉलीवूडच्या या सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्याला नव्या युगात घेऊन जाईल.
ही संध्या अतिशय शानदार उत्सवाने भरलेली होती, कारण तमन्ना भाटिया, वाणी कपूर आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी मंचावर येत चषकावरील आयकॉनिक हार्ट सिंबॉल पुन्हा एकदा साकारला आणि झी सिने अॅवॉर्ड्सच्या आधीच्या पर्वांमधील आपल्या सर्वात खास आठवणींना उजाळा देत या भव्य सोहळ्याची उत्सुकता आणखी वाढवली. 23वे झी सिने अॅवॉर्ड्स 2025 हा भव्य सोहळा 17 मे रोजी मुंबईतील NSCI डोम येथे पार पडणार आहे.
कार्तिक आर्यन म्हणाला, “यंदाचे वर्ष हे माझ्यासाठी माझ्या सर्व मर्यादा पुढे ढकलण्याचे राहिले आहे—मग ते बायोपिक, हॉरर किंवा कॉमेडी असे वेगवेगळे प्रकार एक्सप्लोर करण्याबद्दल असेल. प्रत्येक भूमिकेद्वारे मला माझ्या प्रेक्षकांशी आणि चाहत्यांशी जोडले जाण्याची संधी मिळते आणि त्यांचे प्रेमच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. झी सिने अॅवॉर्ड्सची ‘फॅन्टरटेनमेंट’ संकल्पना खास आहे कारण ती या अनोख्या नात्याचा उत्सव साजरा करते—जिथे चाहते केवळ सिनेमा पाहत नाहीत, तर ते आमच्यासोबत तो जगतात. मी इथे आहे याचा मला आनंद आहे आणि या सुंदर नात्याचा उत्सव साजरा करण्यास मी उत्सुक आहे.”
तमन्ना भाटिया म्हणाली, “आताच तर वर्षाची सुरुवात झाली आहे आणि तरीही हा काळ खूपच रोमांचक आणि सर्जनशील ठरला आहे—वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काम करणे, अनोख्या भूमिका साकारणे आणि जुन्या चौकटी मोडून पुढे जाणे. या संपूर्ण प्रवासात माझ्या चाहत्यांचे अखंड प्रेमच माझी सर्वात मोठी ताकद राहिली आहे. झी सिने अवॉर्ड्सची ‘फॅन्टरटेनमेंट’ संकल्पना खरोखरच कलाकार आणि चाहत्यांमधील या नात्याचा उत्सव साजरा करते आणि त्याचा भाग बनण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
वाणी कपूर म्हणाली, “माझ्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे अखंड प्रेम आणि पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी त्याबद्दल नेहमीच कृतज्ञ राहीन. यंदाचे वर्ष खूपच रोमांचक असेल आणि प्रेक्षकांना काहीतरी खास आणि नविन देण्यास मी उत्सुक आहे. झी सिने अवॉर्ड्सची ‘फॅन्टरटेनमेंट’ संकल्पना सिनेमाची जादू आणि सिनेमा व त्याच्या चाहत्यांमधील अतूट नात्याचा उत्सव साजरा करते. या सोहळ्याचा भाग बनण्याची आणि ही अद्भुत अनुभूती सर्वांसोबत शेअर करण्यासाठी मी अतिशय आनंदात आहे.”
जॅकलीन फर्नांडिस म्हणाली, “2024 माझ्यासाठी उत्साहाने भरलेले प्रोजेक्ट्स, रोमांचक सहयोग आणि अविस्मरणीय परफॉर्मन्स सह खास ठरले. पण खरी जादू माझ्या चाहत्यांकडून येते—त्यांची ऊर्जा, निष्ठा आणि प्रत्येक क्षण खास करण्याची त्यांची ताकद. झी सिने अॅवॉर्ड्सची ‘फॅन्टरटेनमेंट’ संकल्पना या सामूहिक सिनेमाच्या आनंदाचा उत्सव आहे आणि या सोहळ्याचा भाग होण्यासाठी मी खूप उत्साहात आणि आनंदात आहे!”