
no images were found
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे देशपातळीवरील प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचे बक्षिस
इचलकरंजी (प्रतिनिधी ):- डीकेटीईच्या इटीसी विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय केंद्र फॉर रेडिओ अँट्रोफिजिक्स (एनसीआरए) व टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल (टीआयएफआर), नारायणगांव यांच्या वतीने आयोजित केलेल्या जीएमआरटी प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शन २०२५ या स्पर्धेमध्ये सहभाग घेवून तृतीय क्रमांकाचे बक्षिस संपादन केले आहे. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षण, सार्वजनिक सुरक्षा, नागरी सुरक्षा, महिला सुरक्षा, वाहन चालकांची स्थिरता आणि अपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करता येते या क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा घडवता येवू शकतात याचे उत्कृष्ट सादरीकरण करुन त्याचे उत्तम प्रदर्शन केल्याबददल डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध राज्यातील अनेक महाविद्यालयातून १०० हून अधिक महाविद्यालयाचा सहभाग होता.
भूषण गांधी, तेजस्विनी चव्हाण व त्यांच्या सहका-र्यांनी प्रा.डॉ.एस.जे.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसीत केलेल्या फेशियल एक्सप्रेशन्स अनमास्न्ड रिअल टाईम रिकग्निशन सिस्टम या प्रकल्पाने नाविण्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे विविध समस्यांसाठी प्रभावी उपाय सादर केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या सर्जनशीलतेने आणि तांत्रिक कौशल्याने परिक्षकांचे लक्ष वेधले. रिअल टाईम शिक्षण फीडबॅक प्रणाली ही शाळा व महाविद्यालयांमधील सीसीटीव्ही कॅमे-यांशी जोडून विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आणि शिक्षकांच्या अध्यापनाच्या प्रभावीतेचे विश्लेषण करते यामुळे व्यवस्थापनाला त्वरीत फीडबॅक मिळतो आणि शिक्षणपध्दतीत सुधारणा करता येते. सार्वजनिक सुरक्षा आणि निरिक्षक प्रणाली ही फेशियल रिकग्निशन आणि थर्मल सेन्सर्स च्या सहायाने संशयास्पद हालचाली ओळखून संभाव्य धोके टाळण्यास मदत करते. विशेष संप्रेषण तंत्रज्ञान हे डोळयांच्या हालचाली किंवा मोर्स कोडसारख्या संकेतांवर आधारित असून सैनिक व सुरक्षा यंत्रणांसाठी सुरक्षित आणि अत्याधुनिक संवाद साधण्यास मदत करते याचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. सदर प्रोजेक्टसाठी जांग्ज टेक्नॉलॉजी यांचे तांत्रिक व अर्थिक सहाय्य मिळाले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संचालिका डॉ सौ. एल.एस. अडमुठे, विभागप्रमुख डॉ.एस.ए.पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.