Home राजकीय राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

0 second read
0
0
106

no images were found

राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची ही पूर्वनियोजित भेट आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. ठाकरे गटाच्या ताकदवान नेत्या निलम गोऱ्हे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याआधी मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना भेटून एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली होती.

‘या चिमन्यांनो परत फिरा’ असं म्हणत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली होती. त्यामुळे शिंदे गट पुन्हा ठाकरेंसोबत जाणार का? आणि त्याचं नेतृत्व दोन्ही ठाकरे बंधू करतील का असा विश्वास राजकीय विशेषत करत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव गेल्याची चर्चा असताना आता मुंबईत नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज ठाकरे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्यापीठात महात्मा फुले स्मृती व्याख्यानमालेत प्रतिपादन

समकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक : शिवाजी विद्या…