Home मनोरंजन ‘मोस्ट स्टायलिश फीमेल अॅवॉर्ड’ जिंकल्याबद्दल प्रीताने मानले आभार ओजी करणचे

‘मोस्ट स्टायलिश फीमेल अॅवॉर्ड’ जिंकल्याबद्दल प्रीताने मानले आभार ओजी करणचे

19 second read
0
0
34

no images were found

मोस्ट स्टायलिश फीमेल अॅवॉर्ड जिंकल्याबद्दल प्रीताने मानले आभार ओजी करणचे

 

प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या कथा आणि व्यक्तिरेखांसह त्यांचे मनोरंजन केल्यानंतर झी टीव्ही आता पुन्हा एकदा आपल्या झी रिश्ते अॅवॉर्ड्‌सच्या वार्षिक सेलिब्रेशनसह प्रेक्षकांच्या करमणूकीसाठी सज्ज आहे. दरवर्षी ह्या भव्य सोहळ्यात प्रेक्षकांचे त्यांच्या फेव्हरेट झी टीव्ही व्यक्तिरेखांसोबत असलेले दॄढ नाते साजरे केले आहे आणि कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, क्रिएटिव्ह टीम्स आणि तंत्रज्ञांना पुरस्कॄत केले जाते. ह्यावर्षी हा कार्यक्रम होळीच्या सणाच्या जवळपासच पार पडणार असल्यामुळे तो आणखी खास बनला आहे. परिवारांनी एकत्र यावे आणि रंगांच्या सणाचा आनंद घ्यावा यासाठी ही अगदी सुयोग्य वेळ आहे. आपल्या आवडत्या व्यक्तिरेखांसोबत असलेले आपले दॄढ नाते साजरे करण्यासाठी झी कुटुंब सज्ज असून मौजेने भरलेल्या ह्या संध्येमध्ये धमाकेदार परफॉर्मन्सेस, मस्ती मजा आणि मजेदार प्रँक्स पाहायला मिळतील, अर्थातच कौटुंबिक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये – बुरा ना मानो, फॅमिली है!

ह्या भव्य सोहळ्‌याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली असून ग्लॅमरस अभिनेत्री श्रद्धा आर्यावर प्रकाशाचा झोत झळकत आहे. तिला ह्या सोहळ्‌यामध्ये ‘मोस्ट स्टायलिश वुमन’चा प्रतिष्ठित खिताब मिळाला. लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’मध्ये तिने साकारलेल्या प्रीता ह्या व्यक्तिरेखेला सर्वांकडून प्रशंसा मिळाली असून त्यामुळे स्टाईल आयकॉनचा तिचा स्टेटस आणखी दृढ झाला आहे. फॅशन आणि आकर्षक बनून राहण्याच्या तिच्या अचूक समजेला तिच्या चाहत्यांकडून नेहमीच प्रशंसा मिळाली आहे आणि तिचा जो काही पेहराव असेल त्यात अतिशय सहजतेने अभिजातपणे आणि सभ्यतेने वावरल्याबद्दल चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. एवढेच नाही तर जेव्हा तिला पुरस्कार मिळाला तेव्हा श्रद्धाने आपला पूर्व सहकारी अभिनेता आणि ‘रब से है दुआ’मधील नायक धीरज धूपारचे आभार मानले. तिने धीरजची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन त्याच्या स्टायलिश पोशाखांसाठी कौतुकही केले आणि हेही सांगितले की कसे त्याने तिला आपल्या फॅशन गेममध्ये कायम अग्रेसर राहण्यासाठी प्रोत्साहन दिले.

 श्रद्धा आर्या म्हणाली, “ह्या पुरस्कारासाठी मी झी टीव्ही आणि ‘कुंडली भाग्य’चे आभार मानते. माझ्यासाठी अचूक पोशाख आणि दागदागिने निवडण्यासाठी माझ्यासोबत काम करणाऱ्या स्टायलिस्ट्‌सचीही मी आभारी आहे. मला वाटायचं की इतकी वर्षे मी मेहनत घेत आहे पण त्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये, पण मी चुकीची होते. धन्यवाद, झी रिश्ते अॅवॉर्ड्‌स, की तुम्ही माझा ‘मोस्ट स्टायलिश वुमन’ म्हणून गौरव केलात. ह्या खिताबाचा मला अतिशय अभिमान आहे. आमच्या मालिकेमध्ये करणच्या भूमिकेत योगदान देणाऱ्या धीरज धूपारचेही मी आभार मानू इच्छिते. आता सगळेजण म्हणतील की खास क्षणी मला त्याचे नाव घ्यायलाच लागते पण ह्यावेळेस ते अगदी खरं आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा मी धीरजला नव्या पोशाखात नवीन दृश्यामध्ये पाहायचे, तेव्हा मला असं वाटायचं की माझे कपडे तेवढेच चांगले नाहीयेत. तो नेहमीच सुपर स्टायलिश असायचा, आणि मलाही स्पर्धा करण्यासाठी आणि माझ्या गेममध्ये सर्वोच्च राहण्यासाठी त्याने मला प्रोत्साहन दिले.”

 श्रद्धा आर्या तर सध्या सातव्या आसमानात आहे आणि धम्माल करतेय. त्याचसोबत पहा आयकॉनिक ओजी करण प्रीता यांना पुन्हा एकदा, एकत्र, एका आशादायक आणि अविस्मरणीय क्षणासह.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…