
no images were found
‘वागले की दुनिया’ या मालिकेमध्ये महिला दिन साजरा
जसजसा महिला दिन जवळ येतो आहे तसे सोनी सबवरील ‘वागले की दुनिया- नई पीढी नए किस्से’ ही मालिका साई दर्शन सोसायटीचा कणा असलेल्या महिलांसाठी एका विशेष उत्सवाची तयारी करत आहे. या प्रसंगी, मुलांनी आपल्या वडिलांच्या साथीने त्यांच्या सोसायटीतील विलक्षण स्त्रियांना सन्मानित करण्यासाठी एक अनोखा पुरस्कार सोहळा आयोजित केला. सोसायटीमधील महिला या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आणि आपल्यातील सर्वोत्तम गुण प्रदर्शित करण्यासाठी उत्सुक आहेत. स्कोअरिंग सिस्टमप्रमाणे चांगल्या कृत्यांसाठी गुण मिळणार आहेत तर कोणत्याही चुकांसाठी गुण वजा केले जाणार आहेत.
तर, महिला दिनाच्या निमित्ताने सोसायटीतील महिलांना पुरस्कार सोहळ्यात एक सुखद सरप्राइज मिळणार आहे. स्पर्धात्मक वातावरणाऐवजी, कार्यक्रमाचे रूपांतर एकतेच्या, प्रेमाच्या आणि उपस्थित सर्व महिलांच्या कौतुकाच्या उत्सवात झाले. राधिका(भारती आचरेकर) या सगळ्यात जुन्या सदस्यापासून ते किट्टू(माही सोनी) या सगळ्यात छोट्या सदस्यापर्यंत, प्रत्येक महिलेचे कौतुक करण्यात आले आणि त्यांच्या विलक्षण गुणांसाठी तसेच कुटुंब आणि समाजातील योगदानासाठी त्यांना पुरस्कृत करण्यात आले. ‘वागले की दुनिया’ मालिकेतील हा अनोखा उत्सव म्हणजे आपले जीवन समृद्ध करणार्या महिलांना ओळखून त्यांचा सन्मान करण्याचे महत्त्व जाणवून देणारा सोहळा ठरला.
वंदनाची व्यक्तिरेखा साकारणारी परिवा प्रणती म्हणाली,“वागले की दुनिया ही मालिका नेहमीच समाजातील उपेक्षित नायकांना प्रकाशात आणते आणि महिला दिन साजरा करणारे हे नविनतम कथानक त्याला अपवाद नाही. मुलांनी मनापासून आयोजित केलेला हा हृदयस्पर्शी पुरस्कार सोहळा पडद्यामागे अथक परिश्रम करणार्या त्या सर्व महिलांसाठी आहे, ज्यांची बऱ्याचदा दखलही घेतली जात नाही. ज्या मालिकेत आपल्या कुटुंबातील आणि समाजातील महिलांच्या लक्षणीय भूमिकेची कदर केली जाते आणि दखल घेतली जाते, अशा मालिकेत मी वंदना म्हणून सहभागी आहे याचा मला अभिमान वाटतो.”