Home शैक्षणिक “ज्ञानदीप क्लासेस आदर्श विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी सत्कार उत्साहात संपन्न

“ज्ञानदीप क्लासेस आदर्श विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी सत्कार उत्साहात संपन्न

2 second read
0
0
25

no images were found

 

“ज्ञानदीप क्लासेस आदर्श विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी सत्कार उत्साहात संपन्न

कोल्हापूर  ( प्रतिनिधी ) : देशाची भावी पिढी घडविण्याची किल्ली शिक्षकांच्या हातात असते. मूर्तिकार ज्या पद्धतीने सुबक मूर्ती घडवितात त्याप्रमाणे शिक्षक विद्यार्थी घडवितात. परंतु, गेल्या काही वर्षात ठराविक शिक्षण संस्थाची शिक्षण क्षेत्राला कीड लागली आहे. डोनेशन, बिल्डींग फंड अशा नानाप्रकाराने पालकांची लुट केली जात आहे. यासह शिवसेना अंगीकृत युवासेना लगाम घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चांगल्या शिक्षण संस्था समाजासाठी निर्माण होणे गरजेचे आहे. शिक्षण संस्थांनी प्रामाणिकपणे विद्यार्थी घडविण्याचे काम करावे, प्रामाणिक शिक्षकांकडून घडलेले विद्यार्थी देशाचे भवितव्य ठरवतात, असे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले. ज्ञानदीप क्लासेस, शनिवार पेठ यांच्या वतीने आयोजित आदर्श विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याच्या सत्कार समारंभ प्रसंगी श्री.राजेश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन केले.
ज्ञानदीप क्लासेस, शनिवार पेठ यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीचां सत्कार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा गुणगौरव सोहळा पार पडला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री.राजेश क्षीरसागर म्हणाले, कॉलेज जीवनापासूनच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आपण ठेवली आहे. वयाच्या १८ व्या वर्षी शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी विद्यार्थी सेनेच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावर दिली. तेंव्हा पासून आजपर्यंत विद्यार्थी सेना, युवा सेनेच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना विनाडोनेशन प्रवेश मिळावा यासाठी मोर्चा काढला जातो. गेल्या काही वर्षापूर्वी शहरातील एका नामांकित शिक्षणसंस्थेत विधवा महिलेच्या मुलीस बिल्डींग फंड न भरल्याने शाळेत येण्यास मनाई करण्यात आली. याविरोधात युवासेनेने आंदोलन केले असता त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. प्रसंगी जेलमध्ये जावून गरीब विद्यार्थिनीला न्याय मिळवून देणारी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची शिवसेना – युवासेना विद्यार्थी हिताचे काम करत असून, विद्यार्थांना न्याय देण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून मुजोर शिक्षण संस्थावर वचक ठेवून आहे. काही ठराविक मुजोर शिक्षण संस्था वगळता ज्ञानदीप क्लासेस सारख्या प्रामाणिक शिक्षण संस्था शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी ज्ञानदीप क्लासेस, शनिवार पेठ या संस्थेस भावी कारकीर्दीस शुभेच्छा देत, या संस्थेकडून जिल्ह्याचे, राज्यांच आणि पर्यायाने देशाचे भवितव्य घडवणारी पिढी निर्माण करावी अशी आशा व्यक्त करत मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केले असल्याचे सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक सत्यजीत उर्फ नाना कदम, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, संदीप देसाई, निलेश हंकारे ज्ञानदीप क्लासचे संचालक प्रा. निळपणकर सर, प्राचार्य. आर. सी. पाडळकर, सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.एस.चांदणे सर् यांनी केले व आभार प्रा.सौ.निळपणकर यांनी मानले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…