no images were found
राहुल नार्वेकरांकडून दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस; सत्तासंघर्षावर लवकरच निर्णय
मुंबई : सुप्रीम कोर्टाकडून अपात्र आमदारांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवण्यात आली आहे. आपण शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करून याबाबत निर्णय घेऊ असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं.
निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवताच राहुल नार्वेकर हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भांत राहुल नार्वेकरांकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या घटनेच्या आधारे हा निर्णय घेतला जाणार आहे.
दोन्ही पक्षाला म्हणंण मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आता या प्रकरणात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. यावेळी आमदारांना पुराव्यासह आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार आहे.