Home राजकीय हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

8 second read
0
0
24

no images were found

हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

 

   

मुंबई : कोल्हापूर नगरपालिकेचे दि.१५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने महानगरपालिकेची हद्दवाढ झाली नाही. सन १९७२ पासून एक इंचही हद्दवाढ झाली नसल्याने कोल्हापूरच्या विकासावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली होती. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यानुसार आज दि.२४ रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन आले होते. या बैठकीत दोन्ही बाजूच्या नागरिकांना विश्वासात घेवून हद्दवाढीबाबत निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

याबैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव १ असीमकुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव २ के एच गोविंदराज, महानगरपालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक विनय झगडे, मस्कर, संजय चव्हाण आदी कोल्हापूर महानगरपालिका व संबधित अधिकारी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, सद्या राज्यात कोल्हापूर महानगरपालिका हि सर्वात लहान क्षेत्रफळ असणारी एकमेव महानगरपालिका ठरत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी, हि कोल्हापूर वासीयांची गेली कित्तेक वर्षांची मागणी आहे. याबाबत अनेक आंदोलने झाली आहेत. शहराच्या एका बाजूला पूरबाधित क्षेत्राची ब्ल्यू लाईन असल्याने सदर ठिकाणी विकासाच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना केली जाऊ शकत नाही. यासह गेल्या काही वर्षात वाढलेल्या लोकवस्तीमुळे पर्यटन स्थळे, उद्याने, मैदाने, वाहतूक व पार्किंग समस्यां मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी सन २०१६ मध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर हद्दवाढी साठी आमरण उपोषण केले होते. शहराची हद्दवाढ ही विकासाच्या दृष्टीने नैसर्गिक प्रक्रिया आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक या महानगरपालिकेच्या हद्दवाढ अनेकवेळा झाल्याने ही शहरे विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहेत. पुणे महानगरपालिकेची तब्बल १२ वेळा हद्दवाढ करण्यात आली आहे. परंतु कोल्हापूर शहर हद्दवाढी अभावी भकास होत चालले आहे. शहराची हद्दवाढ झाली तर नक्कीच महानगरपालिकेचे आर्थिक उत्पनात वाढ होवून खऱ्या अर्थाने शहराचा विकास साधता येणार आहे. यासह केंद्र व राज्य शासनाच्या लोकसंखेच्या आधारावरील सर्व विकासकामांना निधी मिळू शकणार आहे. हद्दवाढीबाबत शासन सकारात्मक असून, हद्दवाढीबाबत विरोधक नागरिकांना असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे. समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या नागरिकांना विश्वासात घेवूनच हद्दवाढीबाबत निर्णय घेतला जाईल. याबाबत पुन्हा उद्या दि.२५ मार्च २०२५ रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यास आज उपस्थित असलेल्या सर्वच लोकप्रतिनिधीसह  पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.  

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…

‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२५’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा…   नवीन वर्षा…