
no images were found
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या
प्रा.सुदर्शन सुतार, प्रा. मकरंद काईगडे यांचा राज्यस्तरीय सन्मान
कोल्हापूर (प्रतिनिधी):-डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता (सीडी-सीआर) प्रा. सुदर्शन नारायण सुतार आणि टिपीओ प्रा. मकरंद काईंगडे यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेच्यावतीने दोघांचाही सन्मान करण्यात आला. प्रा. सुतार यांना ‘लीडरशिप अवार्ड’ने तर प्रा. काईगडे यांचा ‘यंग अचीव्हर अवार्ड’ने गौरविण्यात आले.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेच्यावतीने लोणावळा येथे एमए टीपीओ डेव्हलपमेंट प्रोग्राम- २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील ५०० हून अधिक महाविद्यालयांचे टीपीओ या संघटनेचे सभासद आहेत. या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. लोणावळा नगरपरिषदेच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, उपाध्यक्ष संजय घोणे, अभिनेत्री रुपाली भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध अधिकाऱ्याना सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांतीकुमार रवंदाळे आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
यामध्ये डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता (सीडी-सीआर) प्रा. सुदर्शन नारायण सुतार यांना‘लीडरशिप अवार्ड’ने तर महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे यांना ‘यंग अचीव्हर अवार्ड’ने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यानी प्रा. सुतार आणि प्रा. काईंगडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.