
no images were found
होली है! झी टीव्हीच्या कलाकारांनी दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा आणि सांगितल्या त्यांच्या या सणाच्या योजना!
रंगांचा सण होळी हा भारतातील सर्वात उत्साही आणि आनंदी उत्सवांपैकी एक आहे, जो लोकांना रंग, संगीत आणि उत्साहाच्या जल्लोषात एकत्र आणतो. या वर्षी 14 मार्च रोजी येणारी होळी वसंत ऋतूचे आगमन आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. उत्सवाची सुरुवात होलिका दहनाने होते, हा एक विधी आहे जो नकारात्मकतेला जाळून टाकून नवीन सुरुवातीचे स्वागत करण्याचे प्रतीक आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी देशभरातील रस्ते रंगांच्या कॅनव्हासमध्ये रूपांतरित होतात कारण लोक आनंदाने एकमेकांवर गुलाल उधळतात. गुजिया आणि मालपुआसारख्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेतात आणि उत्साही तालावर नाचतात. देशभरातील लाखो कलाकारांप्रमाणेच ‘भाग्य लक्ष्मी’मधील ऐश्वर्या खरे, ‘जाने अनजाने हम मिले’मधील आयुषी खुराणा, ‘जमाई नं. 1’ मधील अभिषेक मलिक, ‘वसुधा’मधील प्रिया ठाकूर, ‘कैसे मुझे तुम मिल गये’मधील आकांक्षा चमोला, ‘जागृति-एक नई सुबह’मधील विजयेंद्र कुमेरिया, ‘कुमकुम भाग्य’मधील प्रणाली राठोड यासारख्या झी टीव्ही कलाकारांनाही हा खास प्रसंग साजरा करण्यास उत्सुकता आहे. आपल्या बालपणीच्या होळीच्या आठवणींना उजाळा देत, त्यांनी यावर्षीच्या सणाचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा याची योजना देखील सांगितली.
झी टीव्हीवरील ‘भाग्य लक्ष्मी’ या मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारणारी ऐश्वर्या खरे म्हणाली, “होळी हा नेहमीच माझ्या आवडत्या सणांपैकी एक राहिला आहे कारण तो खूप आनंद देतो आणि एकता आणतो. लहानपणी मी होळीची आतुरतेने वाट पाहत असे, बादल्या रंगीत पाण्याने भरायचे आणि माझ्या घरच्या लोकांवर आणि दोस्तांवर रंगांच्या हल्ल्यांचे नियोजन करायचो. माझ्या सर्वात गोड आठवणींपैकी एक म्हणजे भोपाळमधील माझ्या संपूर्ण परिसरात हा सण साजरा करणे – प्रत्येकजण आपल्या चिंता विसरून त्या क्षणाचा आनंद घेत असत. यावर्षी आम्ही ‘भाग्य लक्ष्मी’ या मालिकेचे चित्रीकरण करणार असल्याने मी माझ्या घरी जाऊ शकणार नाही, पण मी मुंबईत माझ्या दोस्तांसोबत हा दिन साजरा करण्याची योजना आखत आहे. मी नेहमीच एक परंपरा पाळते आणि ती म्हणजे घराबाहेर पडण्यापूर्वी घरी भगवान कृष्णाच्या मूर्तीला थोडासा गुलाल लावणे. सर्वांना प्रेम, आनंद आणि नवीन सुरुवात असलेल्या होळीच्या शुभेच्छा!”
झी टीव्हीवरील ‘जाने अनजाने हम मिले’ या मालिकेत रीतची भूमिका साकारणारी आयुषी खुराणा म्हणाली, “होळी हा सण नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहिला आहे कारण तो आनंद पसरवतो आणि तो आपल्या प्रियजनांसोबत नाते जोडण्याबद्दल आहे. माझ्या बालपणीच्या आवडत्या आठवणींपैकी एक म्हणजे लवकर उठणे आणि दोस्तांसोबत खेळण्यासाठी जाण्यापूर्वी माझ्या आईला गुजिया आणि मालपुआसारख्या मिठाई घरी बनवण्यास मदत करणे. हे वर्ष सूरज आणि माझ्यासाठी आणखी खास आहे कारण लग्नानंतरची ही आमची पहिली होळी असेल आणि मी माझ्या पती आणि सासू-सासऱ्यांसोबत ती साजरी करण्यास उत्सुक आहे. ढोल वाजवण्यापासून ते भव्य कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यापर्यंत ते होळी कशी साजरी करतात याबद्दल मी अनेक कथा ऐकल्या आहेत आणि मी त्याचा भाग होण्यासाठी उत्सुक आहे. मी नेहमीच पाळणारी एक परंपरा म्हणजे प्रेम आणि आदराचे प्रतीक म्हणून माझ्या पालकांच्या कपाळावर गुलालाचा तिलक लावून दिवसाची सुरुवात करणे आणि यावेळी, मी माझ्या सासू-सासऱ्यांसोबतही असेच करणार आहे. सर्वांना आनंदी आणि रंगीत होळीच्या शुभेच्छा”
झी टीव्हीवरील ‘जमाई नं. 1’ मध्ये नीलची भूमिका साकारणारा अभिषेक मलिक म्हणाला, “आमच्यासाठी होळीचा उत्सव एक आठवडा आधीच सुरू व्हायचा! मी आणि माझे मित्र आमच्या इमारतीच्या टेरेसवर जमायचो, रंगीत पाण्याने फुगे भरायचो आणि त्याच्या मैत्रीपूर्ण मारामारीचा आनंद घ्यायचो. होळीच्या दिवशी आम्ही आमच्या सकाळची सुरुवात वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद घेऊन आणि आदर म्हणून त्यांच्यावर गुलाल उधळून करायचो. मग पळापळी, रंग खेळणे आणि ढोलाच्या तालावर नाचणे असा आमचा दिवस असायचा. होळी हा एक असा सण आहे जो लोकांना त्याच्या उबदारपणा आणि मौजेने जवळ आणतो. जर मी या वर्षी शूटिंग करत नसेन तर मी मुंबईतील माझ्या मित्रांसोबत हा दिवस साजरा करेन. ही होळी प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि सकारात्मकता घेऊन येवो!”
झी टीव्हीवरील ‘कैसे मुझे तुम मिल गये’ या मालिकेत मानवीची भूमिका साकारणारी आकांक्षा चमोला म्हणाली, “मुंबईतील होळी नेहमीच पाहण्यासारखी असते, कारण हे शहर उत्सवाची जादू जिवंत करते. येथे उत्सव साजरा करणे हा नेहमीच एक वैविध्यपूर्ण अनुभव राहिला आहे. दोस्तांसोबत खेळण्यापासून आणि बॉलीवूड संगीतासह होळीच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होण्यापर्यंत यात सगळी धमाल असते. माझा आवडता भाग म्हणजे हा उत्सव वेगवेगळ्या संस्कृतींना एकत्र आणतो, ज्यामुळे तुम्हाला एकाच ठिकाणी पुरणपोळी, गुजिया, मालपुआ आणि दही वडा अशा विविध पदार्थांचा आनंद घेता येतो. होळी हा वर्षातील माझ्या आवडत्या सणांपैकी एक आहे आणि मी माझ्या कुटुंबासह आणि माझ्या पतीसोबत तो साजरा करण्यास उत्सुक आहे. आम्ही आधीच संगीत, नृत्य आणि स्वादिष्ट नाश्त्यांनी भरलेल्या दिवसाची तयारी करत आहोत. सर्वांना रंग, आनंद आणि प्रियजनांसोबतच्या प्रेमळ क्षणांनी भरलेल्या होळीच्या शुभेच्छा.”
झी टीव्हीवरील ‘वसुधा’ या मालिकेत वसुधाची भूमिका साकारणारी प्रिया ठाकूर म्हणाली, “होळीचा सण चंदीगडमधील उत्साही उर्जेच्या अनेक आठवणी परत आणतो. रस्त्यांवर गुलालाच्या उधळणीसह आणि ढोलाच्या तालांसह एखाद्या बॉलीवूड चित्रपटात असल्यासारखे वाटते. मला आठवतय मी लहान असताना माझी आई खेळायला बाहेर पडण्यापूर्वी माझ्यावर तेल लावत असे, ज्यामुळे नंतर रंग धुणे सोपे जायचे. मी जवळजवळ संपूर्ण दिवस बाहेर राहायचे, माझ्या दोस्तांसोबत मजा करायचे आणि आम्ही सर्वजण एकत्र गुजियाचा आनंद घ्यायचो. वर्षाचा हा काळ मला नेहमीच माझ्या घरची आठवण करून देतो परंतु या वर्षी मी माझ्या ‘वसुधा’ कुटुंबासह नवीन आठवणी निर्माण करण्यास उत्सुक आहे. मी माझ्या सहकाऱ्यांसोबत हा सण साजरा करण्यास आणि उत्सवात रमून जाण्यास उत्सुक आहे. या आनंदाच्या काळात मला आशा आहे की सर्वजण एकत्र येऊन हास्य आणि अमर्याद उत्साहाचा अनुभव घेतील.”
‘जागृति-एक नई सुबह’ मधील सूरजची भूमिका साकारणारे विजयेंद्र कुमेरिया म्हणाले, “होळी हा एक असा सण आहे जो आपल्या आयुष्यात उबदारपणा आणतो. रंग, उत्साही संगीत आणि आजूबाजूच्या गर्दीतील प्रत्येकालाच ओळखत असल्यासारखे वाटते. होळीच्या वेळी वातावरण नेहमीच सकारात्मकतेने भरलेले असते. मला आठवते की माझ्या बालपणी, आम्ही आमच्या वृद्ध नातेवाईकांना भेटायला जायचो जे बाहेर पडू शकत नव्हते, त्यांच्यासाठी रंग घेऊन जायचो जेणेकरून त्यांनाही या उत्सवाचा आनंद घेत येईल. मला भिजायला कधीच आवडत नसले तरी, माझ्या मित्रांनी मला कधीही सोडले नाही! अर्थात तो सगळा मजेचा भाग होता. मी ते सेलिब्रेशन मिस करत असलो तरी सर्वांनी इको-फ्रेंडली गुलाल वापरणे आणि प्रियजनांसोबत सणाचा आनंद घेणे महत्वाचे आहे. सर्वांना खूप आनंदी आणि आनंदी होळीच्या शुभेच्छा.”
‘कुमकुम भाग्य’मध्ये प्रार्थनाची भूमिका करणारी प्रणाली राठोड म्हणाली, “होळी माझ्यासाठी रंग, संगीत आणि उर्जेबद्दल आहे. होळी लोकांना एकत्र आणते आनंद व उत्सवाचे क्षण निर्माण करते. यावर्षी माझ्या ‘कुमकुम भाग्य’ मालिकेच्या चित्रीकरणातही आम्ही होळीचे एक दृश्य चित्रीत करणार आहोत. मी आमच्या सेटवर या सणाच्या दृश्याच्या चित्रीकरणाची आतुरतेने वाट पाहत आहे आणि मी झी टीव्हीच्या प्रेक्षकांना आणि माझ्या चाहत्यांना सुरक्षित आणि रंगीत होळीच्या शुभेच्छा देते.”