
no images were found
पालकांनी आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी करुन घ्यावी – जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख
कोल्हापूर, : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार 1 मार्च 2025 रोजी वि.मं. वाकरे, ता. करवीर येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. या विशेष मोहिमेअंतर्गत शाळा व अंगणवाडी केंद्र तसेच आश्रमशाळा या ठिकाणी आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले असून पालकांनी आपल्या पाल्याची आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत सर्व मुलांची आरोग्य तपासणी, किरकोळ आजारावर उपचार, विशेष आजारांच्या मुलांना संदर्भ सेवा दिल्या जाणार आहेत. यात जन्मजात व्यंग कमतरता, विकासात्मक विलंब व आजार यावर मोफत उपचार व शस्त्रक्रीया करण्यात येतील.
करवीर तालुक्यात सेवा रुग्णालय, कसबा बावडा अंतर्गत तीन पथके कार्यरत असून 31 मार्च 2025 पर्यंत शाळा व अंगणवाडी आरोग्य तपासणीचे वेळापत्रक करण्यात आले आहे. दि. 15 मार्च – गडमुडशिंगी, कोगिल खुर्द, दि. 17 मार्च – सरनोबतवाडी, कणेरीवाडी, नंदवाळ-पिरवाडी, दि. 18 मार्च – कंदलगाव, पाचगाव व भुये- जठारवाडी, दि. 19 मार्च – मोरेवाडी, पाचगाव, केर्ले, दि.20 मार्च – भुयेवाडी, पाचगाव, केर्ली, दि. 21 मार्च – गडमुडशिंगी, पाचगाव, वडणगे, दि. 22 मार्च – गडमुडशिंगी, जैताळ, वडणगे, दि. 24 मार्च- पाचगाव, वरणगे, बेले याप्रमाणे करण्यात आले आहे, अशी माहिती करवीर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने व सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. निलिमा पाटील यांनी दिली आहे.