
no images were found
बहारदार दृश्यांपासून ते प्रभावी कलाकारांपर्यंत- सोनी सबवरील ‘वीर हनुमान’ मालिका पाहण्याची ४ कारणे
सोनी सब आता ‘वीर हनुमान’ ही मालिका भक्तीमय महाकाव्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज आहे. या कथेच्या माध्यमातून प्रभू हनुमानाची आख्यायिका अभूतपूर्व पद्धतीने जीवंत केली आहे. या शौर्यगाथेद्वारे लहानग्या हनुमानाचे आदरणीय प्रभू हनुमानात झालेले असामान्य रुपांतर उलगडून दाखवले आहे, जेव्हा ते आत्मशोधाच्या आणि दैवी ध्येयाच्या शोधात निघतात. सोनी सबवर सोमवार ते शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारीत होणारी ही मालिका 11 मार्चपासून सुरु होत आहे. ही मालिका तुम्ही चुकवू नका असा आग्रह आम्ही करतोयत, कारण-
सर्व पिढ्यांसाठी एक मालिका
तुमच्यात पौराणिक कथांनी भारावलेले मूल असेल, तुमच्या कुटुंबासाठी नैतिक मूल्ये शोधणारे पालक असेल किंवा दीर्घकालीन कथा जपणारे तुम्ही आजोबा असाल.. ‘वीर हनुमान’ मालिकेत प्रत्येकासाठी काहीतरी आहे. मालिकेतील दृश्ये अत्यंत भव्य आणि आध्यात्मिकदृष्टीने समृद्ध आहे. यामुळे हे कथानक कुटुंबांना एकत्र आणते. ज्ञान, मनोरंजन आणि भक्ती समप्रमाणात देते.
समृद्ध कलाकार आणि दमदार सादरीकरण
‘वीर हनुमान’ मध्ये एक दमदार कलाकार आहे, जे प्रभू हनुमानाच्या फार महिती नसलेल्या कथेला अत्यंत उत्कटता, सखोलता आणि अस्सल अभिनयाने जिवंत करतो. आन तिवारी हा प्रतिभावान कलाकार बाल हनुमानची भूमिका करतोय. त्याची निरागसता आणि खोडकरपणा सटीकपणे दाखवतो. अरव चौधरी हे हनुमानाचे महान पिता केसरी यांच्या भूमिकेत आहेत. तर सायली साळुंखे ही हनुमानाची लाडकी आई अंजनीची भूमिका सुंदरपणे साकरते. शक्तीशाली बाली आणि ज्ञानी सुग्रीव अशी दुहेरी माहिर पांधी हे साकारत आहेत. हृदयस्पर्शी भावना, निस्सीम भक्ती आणि भव्य अभिनय तुम्हाला पाहयाला मिळेल, ज्यामुळे तुम्ही थक्क व्हाल.
डोळ्यांची पारणे फेडणारी दृश्ये आणि अस्सल वेशभूषा
कोणतेही पौराणिक महाकाव्य थरारक दृश्ये, लक्षपूर्वक तयार केलेले सेट आणि प्राचीन काळातील भव्यता दर्शवणारी दोलायमान वेशभूषा यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. वीर हनुमान मालिकेतही हेच देण्याचे वचन पाळले आहे. प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक ओआणि प्रॉडक्शन डिझायनर ओमंग कुमार यांनी डिझाइन केलेल्या या महाकाव्याचा आकर्षक सेट त्यांच्या कलात्मक बुद्धीमत्तेची तसेच चिरंतनतेचा पुरावा देते. किष्किंधा नगरी साकारण्यासाठी सुमारे तीन महिने काम करावे लागले. प्रत्येक बारकावे, त्या काळातील वर्णनांशी जुळतील, याची खात्री करावी लागली. वेशभूषेतून स्वत:ची एक कथा सांगितली जाते. तसेच या वेशभूषा मालिकेतील पात्रांचे व त्यांच्याशी संबंधित पौराणिक प्रसंगांना अचूक दर्शवण्यासाठी डिझाइन केली आहे. अत्यंत काळजीपूर्वक केलेले डिझाइन, पॅटर्न्स आणि दागिने वापरून एक शाही आणि दैवी वातावरण तयार करण्यात आले आहे. अजिंठा-वेरुळमधील कोरीव कामापासून प्रेरणा घेत, प्रत्येक फ्रेमचे दृश्य एक मेजवानी ठरते. यामुळे हा अनुभव खरोखरच थक्क करणारा ठरतो.
प्रभू हनुमानाचा आत्मशोधाचा प्रवास
वीर हनुमान ही पौराणिक कथा तर आहेच, पण त्याही पलिकडे आत्म साक्षात्कार, धाडस आणि ध्येयाची कथा आहे. बाल हनुमान त्याच्या लपलेल्या दिव्य शक्ती कशा प्रकारे शोधतो. तसेच प्रिय हनुमान म्हणून त्याच्या नशीबातला प्रवास कसा स्वीकारतो, हे पाहता येईल. श्रद्धा आणि जिद्दीचा हा प्रवास सर्व वयोगटातील प्रेक्षकांना त्यांच्यातील आत्मिक सामर्थ्य स्वीकारण्यासाठी आणि त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याकरिता प्रेरणा देणारा ठरेल.