
no images were found
शिवाजी विद्यापीठात श्याम बेनेगल यांच्या चित्रपटावर
दोन दिवसीय राज्यस्तरीय सेमिनारचे आयोजन
कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने दि. ७-८ फेब्रुवारी २०२५ रोजी “दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या चित्रपटातील महिला प्रतिमा” या विषयावर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहात दोन दिवसीय राज्यस्तरीय सेमिनारचे आयोजन सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. सेमीनारचे उदघाटन व मार्गदर्शन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) दिगंबर शिर्के करणार आहेत. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रमोद पाटील याची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सेमिनारचे बीजभाषण जेष्ठ चित्रपट अभ्यासक व लेखक डॉ. चंद्रकांत लंगरे करणार आहेत. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. विश्राम ढोले असणार आहेत.
या कार्यशाळेत दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे भारतीय वास्तववादी, नववास्तववादी, न्यू वेव्ह, समांतर आणि कलात्मतक चित्रपट चळवळीत महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या योगदानावर डॉ.राजेंद्र गोणारकर (नांदेड), डॉ.प्रसाद ठाकूर (पुणे), डॉ.विशाखा गारखेडकर (औरंगाबाद), सरफराज मुल्ला, डॉ.अंजली निगवेकर (कोल्हापूर), मार्गदर्शन करणार आहेत. सेमिनारच्या आधी नाममात्र शुल्क भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सेमिनारचा लाभ चित्रपट अभ्यासकांनी घ्यावा, असे आवाहन स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ.निशा मुडे-पवार यांनी केले आहे.