Home सामाजिक इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून होणार प्रमुख शहरांचा विकास : आमदार राजेश क्षीरसागर, 

इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून होणार प्रमुख शहरांचा विकास : आमदार राजेश क्षीरसागर, 

16 second read
0
0
17

no images were found

इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून होणार प्रमुख शहरांचा विकास : आमदार राजेश क्षीरसागर, 

मुंबई : भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत- भारत@२०४७(India@2047)” करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकारताना विकसित भारताची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या दृष्टीने महाराष्ट्र राजाची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. हे होत असताना विकासापर्यंत पोहचणे गरजेचे असून, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून राज्यातील शहरांचा विकास साध्य करू, असे प्रतिपादन मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पी पी पी) द्वारे महापालिकांचा विकास करण्यासंदर्भात मित्रा संस्था कार्यालय, मंत्रालय मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली.

      या बैठकीत इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या माध्यमातून पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पी पी पी) राज्यातील महानगरपालिकांचा विकास करणे, संसाधने वाढविण्यासाठी तांत्रिक सहाय्यता देणे, महानगरपालिका क्षेत्रात निधी उपलब्ध करणे या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

     यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहराचा विचार करता शहराची भौगोलिक स्थिती चांगली असतानाही शहर विकासापासून वंचित आहे. शहराचा विकास साध्य करण्यासाठी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी १५०० कोटी निधीची आवश्यकता आहे. रिंग रोड, अंडरपास, ओवर ब्रिज, पार्किंग स्लॉट निर्माण होणे आवश्यक आहे. पंचगंगा प्रदूषण नियंत्रण, निर्माण चौकात महानगरपालिकेची नवीन इमारत आदी सुविधा तात्काळ उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासह कोल्हापूर शहरासाठी ई बस सेवा अशा नाविन्यपूर्ण सुविधा देखील देणे आवश्यक आहे. यासह इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी केली. 

        शहरातील विकासांसाठी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्यावतीने अत्यंत कमी व्याजदरात हे कर्ज उपलब्ध होणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात आय एफ सी कशी मदत व विकास करू शकेल यासाठी आय एफ सी चे शिष्टमंडळ लवकरच कोल्हापूर येथे भेट देणार आहे.    

   या बैठकीसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तसेच मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, मित्र या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या रिजनल डायरेक्टर इमाद फकोरी व कंट्री डायरेक्टर वेंडी वर्नर व इतर पदाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी तर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी उपस्थित होत्या.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आ…