Home शेती माजी विद्यार्थ्यांसोबत कॉफी विथ टेक्सप्रेन्युअर्स प्रेरणादायी नाविण्यपूर्ण उपक्रम – डीकेटीई स्टार्टअप कटटा

माजी विद्यार्थ्यांसोबत कॉफी विथ टेक्सप्रेन्युअर्स प्रेरणादायी नाविण्यपूर्ण उपक्रम – डीकेटीई स्टार्टअप कटटा

6 second read
0
0
26

no images were found

माजी विद्यार्थ्यांसोबत कॉफी विथ टेक्सप्रेन्युअर्स प्रेरणादायी नाविण्यपूर्ण उपक्रम – डीकेटीई स्टार्टअप कटटा

इचलकरंजी (प्रतिनिधी):- इंजिनिअर होणा-या बहुतांश विद्यार्थ्यांना असे वाटते की आपण पदवी प्राप्त करुन नोकरी करावी व उत्तम पॅकेज मिळवावा खरेतर हे ध्येय उराशी बाळगूनच ते त्यांची पदवी पूर्ण करीत असतात. पण हे सर्व करीत असताना हे विद्यार्थी उत्तम उदयोजक देखील होवू शकतात ही भावना त्यांच्या मनामध्ये दृढ होणे गरजेचे आहे. त्यासाठीच उदयोजक बनणे याबददलच्या त्यांच्या मनातील भिती, त्यांच्या शंका, या समोरील अव्हाने याची विस्तृतपणे माहिती देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधण्यासाठी डीकेटीईच्याच यशस्वी उदयोजक व माजी विद्यार्थ्यांची व्याख्याने स्टार्ट अप कटटा विक मध्ये आठवडाभर डीकेटीईमध्ये संपन्न झाली.

माजी विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला. इंटरव्यूव्ह राउंड मध्ये माजी विद्यार्थी उदयोजकांना प्रश्‍ने विचारत विद्यार्थ्यांनी आपल्या शंकाचे निरसन करुन घेतले. यामुळे त्यांच्या उदयोजक होण्याच्या स्वप्नांना बळ मिळाले. डीकेटीईचे माजी विद्यार्थी जगभर कार्यरत आहेत व हे माजी विद्यार्थी नेटवर्क खूप घटट असे आहे. हे माजी विद्यार्थी ज्यावेळेस मातृसंस्थेला भेटायला येतात त्यावेळेला त्यांच्या चेह-यावरचा रुबाब आणि त्यांच्या व्यक्तीमत्वातील बदल प्रकर्षाने जाणवतो व त्यांचा मातृसंस्थेला असलेला जिव्हाळा देखील.

उद्योजक बनणे हे आव्हानात्मक पण खूप पुरस्कृत करणारे कार्य आहे. यामुळे तुम्ही परिवर्तन आणू शकता, उदयोजक हा व्यवसाय सुरु करुन केवळ स्वत:चे जीवन बदलत नाही तर अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देतो त्यामुळे आर्थिक विकास होतो. नविन तंत्रज्ञान, उत्पादन पध्दती व ग्राहकांच्या अपेक्षा यामध्ये सतत बदल होत असतो त्यामुळे या बदलाचा अभ्यास करत सृजनशिलता व नाविण्याचा आधारे व्यावसायिक बना व आपल्या कुटुंबरोबरच संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी बना असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

येथील डीकेटीर्ई इन्स्टिटयूट मधील टेक्स्टाईल विभागातर्फे उद्योजकता विकास कार्यक्रम अंतर्गत कॉफी विथ टेक्सप्रेन्युअर्स या प्रेरणादायी सत्रासह स्टार्टअप कटटा सप्ताह संपन्न झाला. वस्त्रोद्योगमधील उद्योजक होण्यास इच्छूक असणा-या विद्यार्थ्यांसाठी व वस्त्रोद्योग क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय विचारसरणी जोपासण्याच्या उददेशाने हा नविन उपक्रम संपन्न झाला.या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना अनेक माजी विद्यार्थी, कार्यकतृत्वसंपन्न उद्योजक यांच्याशी संवात साधत सक्षम उद्योजक बनण्याचे प्रभावी कानमंत्र मिळाले.  

संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे आणि संचालिका प्रा. डॉ एल.एस.अडमुठे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे सत्राची सुरवात झाली व त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्यात उत्साह निर्माण झाला. पहिल्या दिवशी कार्यक्रमात माजी विद्यार्थी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीईडीचे प्रविण कायंदे यांनी मनोगतामध्ये सरकारी योजना, प्रशिक्षण व संधी यावर मार्गदर्शन केले. डीकेटीईचे वस्त्रोद्योगमधील प्रतिष्ठित माजी विद्यार्थी अंकुश कांबळे, संजय क्वाने, पी.एम.सोज, श्रीकांत पाटील, अतुल कुलकर्णी, नितिन शिंदे, संदीप सागांवकर, आमृत छाजेर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उदयोजकांशी संवाद साधला व त्यांच्या जीवनप्रवासातील आव्हाने, त्यावर त्यांनी केलेली यशस्वी मात याबददल विविध प्रश्‍नांद्वारे शंकानिरसन करुन घेतले.

सूत्रसंचालक दर्शन खटोड आणि मांडवी दुबे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि पाहुण्या वक्त्यांमध्ये चर्चा संपन्न झाली. प्रोग्राम समन्वयक, टेक्नीकल टेक्स्टाईल, डॉ मंजुनाथ बुर्जी यांनी आभार मानले. या स्टार्टअप विकसाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे, ट्रस्टी रवी आवाडे व सर्वच ट्रस्टी यांनी शुभेच्छा दिल्या. डे. डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…