
no images were found
नाना पालकर यांची पत्रकारिता’ वर आज नंदकुमार ओतारी यांचे मार्गदर्शन
कोल्हापूर ( प्रतिनिधी):-प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य दिवंगत ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांची पत्रकारिता आणि आठवणी या विषयावर जेष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागामध्ये शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे. नाना पालकर यांनी चार दशके कोल्हापूर आणि दिल्ली येथे पत्रकारिता केली होती. त्यांच्या पत्रकारितेची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तथापि, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून पत्रकारांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.