
no images were found
राजारामपुरी विभागीय कार्यालयाची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर( प्रतिनिधी):- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सात कलमी कृती आराखडा तयार केला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आज प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी राजारामपुरी विभागीय कार्यालयाची सकाळी पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या नागरी सुविधा केंद्र, विभागीय कार्यालय क्र.3, नगररचना विभाग, घरफाळा विभागाची पाहणी केली. यावेळी या ठिकाणी नागरीकांना देण्यात येणा-या सेवा व सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. याठीकाणी सार्व.टॉयलेट व शौचालयाची पाहणी त्यांनी केली. यामध्ये महिलांसाठी व पुरुषांसाठी असलेल्या टॉयलेट व शौचालयाची आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. या टॉयलेटवर महिलांसाठी व पुरुषांसाठीचा वेगळे बोर्ड लावणे, या कार्यालयात येणा-या नागरीकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नागरी सुविधा केंद्राची रंगरंगोटी, पिण्याच्या पाण्याची वेगळी व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी उप-शहर अभियंता यांना दिल्या. त्याचबरोबर नागरी सुविधा केंद्रातील किऑस्क बंद असलेचे तक्रारी येत असलेने समक्ष जाऊन त्या मशिनची पडताळणी प्रशासकांनी केली. यावेळी सदरचे मशीन सुरु असलेचे निदर्शनास आले.
यावेळी अतिरिक्त उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, एन एस पाटील, उपशहर अभियंता आर के पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार आदी उपस्थित होते.