
no images were found
विद्यार्थ्यांचे परीक्षेतील यश अभिमानास्पद – डाॅ. के. जी. पाटील
कोल्हापूर ( प्रतिनिधी):-श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर संचलित उचगांव येथील एनबीए मानांकित न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एनआयटी) विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या हिवाळी २०२४ परीक्षेत भरघोस यश मिळवले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी डाॅ. के. जी. पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध आहे.’ व्हाईस चेअरमन डी. जी. किल्लेदार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी प्राचार्य डाॅ. संजय दाभोळे बोलले, ‘शासनाच्या युक्ती पोर्टलवर नोंद होणारे विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प, स्किल हबचे तंत्रकौशल्य विकास कोर्सेस, भाषा विकास, विभागीय व राज्य स्तरावरील खेळातील प्राविण्य आणि परीक्षेतील यश याद्वारे एनआयटी हे अतिउत्कृष्ट शैक्षणिक केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल आहे.’ एनआयटीच्या तब्बल ५१ विद्यार्थ्यांनी ९०% व त्यावर गुण मिळवले. साधना जाधव (कम्प्युटर) ९६.००% गुण मिळवून अव्वल ठरली. तर सिधांत साळोखे (कम्प्युटर) ९५.४७%, मोनिका सावंत (एआयएमएल) ९५.४४%, हर्ष देसाई (एआयएमएल) ९५.३३%, प्रणव रामाणे (कम्प्युटर) ९५.२६% व सुहानी देसाई (इलेक्ट्रीकल) ९५.१०% यांनी भरघोस गुण मिळवले. तर सिद्धेश चौगले, प्राची शिंदे, महेक मुजावर व सुहानी देसाई यांनी विविध विषयांत १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. पारदर्शकतेसाठी बोर्डाच्या या परिक्षा सीसीटीव्ही कॅमेर्यात घेतल्या जातात. एनआयटीमध्ये आता डिप्लोमासह डिग्री इंजिनिअरिंग कोर्सेस उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डाॅ. नितीन पाटील यांनी दिली. यावेळी विभागप्रमुख, स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.