
no images were found
प्राथमिक शिक्षण समितीमार्फत आयोजित आंतरशालेय क्रीडा स्पर्धेअंतर्गत फुटबॉल स्पर्धा संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी):- प्राथमिक शिक्षण समितीमार्फत विविध उपक्रम महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात. दरवर्षीप्रमाणे सन 2024- 25 फुटबॉल स्पर्धा महात्मा गांधी मैदान येथे दिनांक 30 व 31 जानेवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आली आहे. प्रशासक के मंजूलक्ष्मी यांच्या प्रेरणेने व उपायुक्त साधना पाटील, प्रशासन अधिकारी आर व्ही कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत 15 महापालिकेच्या शाळांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेचे नियोजन क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, सुशील जाधव, संतोष आंबेकर, संदीप जाधव, मोहिद्दीन कमते, मनोज शिंदे, शब्बीर नदाफ, रहमान मणेर, योगेश व्हटकर यांनी केले.
आज दि.31 जानेवारी 2025 रोजी सेमी 1 साठी महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी विरुद्ध लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर यांच्यात खेळविण्यात आला. यामध्ये फुलेवाडी विद्यालयकडून आलोक कुकडे याने एक गोल करुन विजय 1-0 ने हा सामना जिंकला. सेमी 2 मध्ये टेबलाईवाडी विद्यामंदिर विरुद्ध नेहरूनगर विद्यामंदिर यांच्यात खेळविण्यात आला. हा सामना संपेपर्यंत 0-0 राहिल्याने ट्राय ब्रेकर वर टेंबलाईवाडी विद्या मंदिर 3-2 असा विजय मिळविला. तृतीय क्रमांक नेहरूनगर विद्यामंदिर विरुद्ध लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर यांच्यात खेळवण्यात आला. यामध्ये नेहरूनगर विद्यामंदिर कडून आरहान मुल्लानी एक गोल करुन 1-0 असा सामना जिंकला. अंतिम सामना टेंबलाईवाडी विद्यामंदिर विरुद्ध महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडी यांच्यात खेळवण्यात आला. हा सामना संपेपर्यंत 0-0 असा राहिल्याने ट्राय ब्रेकवर टेंबलाईवाडी विद्या मंदिरने 3-2 ने विजयी मिळवला. टेंबलाईवाडी विद्यामंदिर संघाकडून ओम सोनवले, प्रशांत पानेगाव, वेदांत कांबळे, सौरभ कोळी, अफान लांजेकर, सिद्धार्थ वाघरे, अविरत दवडते, हर्षराज पाटील, देवराज शिंदे, सोहम जाधव, आलोक आकुर्डेकर, तनिष्क चव्हाण, वरद पाटील, आदित्य देऊडकर यांनी सहभाग घेतला यांना शिक्षक पी जी लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. उपविजयी महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी संघाकडून आलोक कुकडे, प्रचेत पवार, साबीर खानापुरे, शौर्य कांबळे, आयुष पाटील, श्रेयश पवार, वेदांत तोरस्कर, मयुरेश चौगुले, रणवीर पाटील, सोहम पाटील, पियुष भांडवले, प्रसाद पोतदार, रोहित कात्रट, पार्थ वाघ, शौर्य शिपेकर यांनी भाग घेतला. त्यांना शिक्षक नितीन गभाले याचे मार्गदर्शन लाभले.