Home शासकीय सांख्यिकी कार्यालयामार्फत होणाऱ्या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – सीमा अर्दाळकर

सांख्यिकी कार्यालयामार्फत होणाऱ्या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – सीमा अर्दाळकर

13 second read
0
0
25

no images were found

सांख्यिकी कार्यालयामार्फत होणाऱ्या सर्वेक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे – सीमा अर्दाळकर

 

कोल्हापूर, : राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही “कुटुंबाचा आरोग्य विषयक होणारा खर्च” या विषयावर सर्वेक्षण होणार आहे. या पाहणी अंतर्गत आयुक्त, अर्थ व सांख्यिकी संचालनालय मुंबई कार्यालयामार्फत जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीपर्यंत माहिती गोळा करण्यात येत असून या सर्वेक्षणाकरीता घरी येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कुटुंबनिवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्य विषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सर्व संबंधित कुटुंबीय व संबंधित व्यक्तींनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक सीमा अर्दाळकर यांनी केले आहे.

        या सर्वेक्षणानुसार निवड झालेल्या कुटुंबाकडून मागील ३६५ दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. पाहणीनंतरच्या निष्कर्षांमधून केंद्र व राज्य शासनास आरोग्य सेवा सुधारणा व नियोजनासाठी तसेच त्याबाबत धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त माहिती मिळणार आहे.

          ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होणार असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खासगी रुग्णालय, दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड ‘एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब’ आणि ‘मागील ३६५ दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती’ यामधून करण्यात येणार आहे. सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा उपयोग आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा आणि सरकारच्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी होतो. राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर प्रभावी निर्णय घेणे शक्य व्हावे यासाठी सर्वेक्षणाच्या माहितीची सत्यता व गुणवत्ता अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबत घरभेटीसाठी येणाऱ्या पुणे विभागातील सर्व कर्मचारी,अन्वेषक यांचे नाशिक येथे प्रशिक्षण झाले आहे.

 नमुना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील, असेही श्रीमती अर्दाळकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना नेहमी मदत करण्याचा प्रयत्न करतो”-आन तिवारी

“हनुमानजींच्या भक्तीचा मी प्रशंसक आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मी देखील माझ्या कुटुंबियांना आ…