Home शैक्षणिक विद्यापीठात ई- कंटेंट कार्यशाळेचा समारोप 

विद्यापीठात ई- कंटेंट कार्यशाळेचा समारोप 

12 second read
0
0
36

no images were found

विद्यापीठात ई- कंटेंट कार्यशाळेचा समारोप 

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी):-शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र व एम.ए. मास कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम उषा अंतर्गत ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ इ- कंटेन्ट फॉर ऑनलाईन लर्निंग अँड मूक्स’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप झाला.  कार्यशाळेचा आज दुसरा दिवस होता. यावेळी  प्रमुख मार्गदर्शक म्हणून व्हिडीओ एडिटर अक्षय दळवी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी दुरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे उपकुलसचिव व्ही. बी. शिंदे होते.

    दळवी यांनी ऍडॉब प्रीमियर-प्रो या व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर वापराबद्दलची माहिती दिली. यातील इफेक्ट कंट्रोल, प्रोजेक्ट प्लॅनर, टाईमलाईन पॅनेल या टूल्सबरोबरच विविध एडिटिंग इफेक्ट्सची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली. तसेच हे सॉफ्टवेअर शिक्षक व विद्यार्थ्यांना हाताळायला देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यानंतर संगीत व नाट्यशास्त्र विभागात असलेल्या क्रोमा स्टुडिओला भेट देण्यात आली. तेथील तंत्रज्ञ मल्हार जोशी यांनी कॅमेरा, लाईट्स, स्टुडिओ, माईक, क्रोमा याचे महत्त्व समजावून सांगितले.

       स्वागत व प्रास्ताविक मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ.सुमेधा साळुंखे यांनी करून दिली. सूत्रसंचालन जयप्रकाश पाटील यांनी केले तर आभार डॉ. नितीन रणदिवे यांनी मानले. यावेळी विविध विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…