
no images were found
भाजपा जिल्हा कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्ती पत्रांचे वितरण
कोल्हापूर : सामान्य प्रशासन विभागाच्या शासननिर्णयानुसार कोल्हापूर शहरातील व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केल्याची यादी नुकतीच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केली. यामुळे शासकीय कामांसाठी लागणारी कागदपत्रे साक्षांकित करण्याची गौरसोय दूर होणार आहे.
आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, डॉ राजवर्धन, अशोक देसाई, संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कोल्हापूर शहरातील जवळपास १५७ पदाधिका-यांना विशेष कार्यकारी अधिकारी पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपा जिल्हा कार्यालयात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती.
जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी यांचे स्वागत करून सर्वसामान्य कार्यकर्त्याना अभिमान असणारी हि नियुक्ती असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागात सर्वसामान्य नागरिकांच्या उपयोगासाठी प्रयत्नशील रहावे असे याप्रसंगी सांगितले. याप्रसंगी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नव नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती होती.