Home आरोग्य राज्यात आणखी दोन दिवस पावसाचे

राज्यात आणखी दोन दिवस पावसाचे

0 second read
0
0
64

no images were found

राज्यात आणखी दोन दिवस पावसाचे

पुणे : हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखीन २ दिवस मुसळधार पाऊस राहणार आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्यात सतत पाऊस सुरू आहे. राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ आणि मराठवाडा भागात सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसेल. राजस्थान, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेशचा काही भाग व मध्य प्रदेसतील काही भागातून पाऊस माघारी फिरला असून तो येत्या चार दिवसांत मध्य भारतातील काही भागात परतीचा प्रवास करेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Load More Related Articles

Check Also

तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह देसाई.

  तळातील समाजघटकांना परवडणारे तंत्रज्ञान अभियंत्यांनी विकसित करावे.- डाॅ. प्रतापसिंह …