
no images were found
कागल एमआयडीसीतील लघू उद्योजकांना प्राधान्याने भूखंड वाटप करा– पालकमंत्री मुश्रीफ
कागल एमआयडीसी क्षेत्रात भूखंड वाटप करताना लघू उद्योजकांनाही प्राधान्याने भूखंड वाटप होणे आवश्यक आहे. या पध्दतीमध्ये काही त्रुटी अथवा अडचणी असल्यास त्या तात्काळ दूर करुन या उद्योजकांना प्राधान्याने भूखंड वाटप होण्यासाठी सकारात्मक पावले उचला, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
कागल एमआयडीसी क्षेत्रातील लघू उद्योजकांच्या भूखंड वाटपाबाबत आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चे अधिकारी व लघु उद्योजकांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेवून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे उपस्थित होते. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लघु उद्योजकांसोबत चर्चा करुन त्यांना आवश्यक असलेली माहिती तात्काळ उपलब्ध करुन देवून त्यांच्या शंकांचे निराकरण करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.