no images were found
दिवाळीसाठीवेगवेगळे प्लान करत आहेत सोनी सबवरील कलाकार
दिवाळी हा दिव्यांचा सण. सगळ्यांनी एकत्र येण्याचा, आनंद साजरा करण्याचा सण. यावर्षी, सोनी सबवरील लोकांचे लाडके कलाकार केवळ आपल्या मालिकांमधूनच नाही, तर सेट्सवर देखील या उत्सवाचा आनंद साजरा करण्यास उत्सुक आहेत. त्यांचे वेळापत्रक इतके व्यस्त असते की, ते आपल्या सह-कलाकारांसोबत आणि क्रूसोबतच दिवाळी साजरी करतात. आणि सगळ्यांना त्या उत्सवात सामील करून घेतात.
‘बादल पे पांव है’ मालिकेत रजत खन्ना ही व्यक्तिरेखा साकारणारा आकाश आहुजा म्हणतो, “दिवाळी हा खूप खास समय असतो. पण अभिनेता म्हणून आम्हाला बऱ्याचदा वेळेवर एपिसोड तयार ठेवण्यासाठी सणवाराच्या दिवसांतही काम करावे लागते. आमची टीम आमच्या वेळापत्रकाची आखणी व्यवस्थित करत असते. आम्ही दिवसाचा जास्तत जास्त वेळ सह-कलाकारांसोबत व्यतीत करत असतो, त्यामुळे सगळे सण आम्ही आवर्जून सेटवरच साजरे करतो. इतका काळ एकत्र शूटिंग करत असल्याने आम्ही जणू एक कुटुंबच होऊन जातो, त्यामुळे यावर्षीही आम्ही सेटवर दिवाळी साजरी करणार आहोत. पण, मी कुठेही असलो, म्हणजे घरी असलो किंवा शूटिंग करत असलो, तरी सणाचा मनमुराद आनंद घेतो.”
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत सीतेची भूमिका करणारी प्राची बंसल म्हणते, “आजवर मी प्रत्येक दिवाळी माझ्या कुटुंबासोबत साजरी केली आहे पण यावर्षी पहिल्यांदाच हा सण मला त्यांच्या सोबत करता येणार नाही. पण माझे भाग्य थोर आहे, कारण यावर्षी आमच्या मालिकेत राम आणि लक्ष्मणाची भूमिका करणाऱ्या सुजय रेऊ आणि बसंत भट्ट सोबत मी अयोध्येत हा सण साजरा करणार आहे.अयोध्येच्या भव्य आनंदोत्सवात सहभागी होता येणे ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. यावर्षी मी माझ्या कुटुंबापासून लांब असले तरी आमच्यातली एकजुटीची भावना तशीच दृढ आहे.”
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका करणारा बसंत भट्ट म्हणतो, “दिवाळी सर्वांनी एकत्र येण्याचा सण आहे आणि सेटवर असताना माझ्या मनात हीच भावना असते. सह-कलाकार आणि क्रू यांच्यासोबत काम करता करता आम्ही एक कुटुंब झालो आहोत. आमच्यात हास्य-विनोद चालतात, अवघड दृश्ये कशी करावीत याबाबत चर्चा होतात, एकंदरित, प्रत्येक दिवस विशेष असतो. सध्या मी जरी माझ्या घरापासून लांब येथे उंबरगावला असलो, तरी इतक्या सुंदर टीमसोबत काम करताना आम्ही जणू दररोज दिवाळी साजरी करत आहोत, असे वाटते.”
‘श्रीमद् रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारा सुजय रेऊ म्हणतो, “अभिनेता म्हणून बऱ्याचदा आम्हाला आमच्या कुटुंबासोबत सण साजरे करता येत नाहीत. आउटडोर शूटिंग असले तर अजिबातच नाही. पण सेटच जणू दुसरे घर होतो आणि आम्ही सगळे जण एकत्र मिळून सणवार साजरे करतो. ही दिवाळी तर माझ्यासाठी विशेषच आहे कारण मी श्रीरामाची भूमिका करत आहे आणि दिवाळीत अयोध्येला जाणार आहे. मी घरापासून लांब असलो तरी सेटवरचे माझे कुटुंब आणि त्यांचे प्रेम माझा आनंद अविस्मरणीय करतात. यावर्षी रामभक्तांसोबत मी अयोध्येला दिवाळी साजरी करणार आहे. दरवर्षी तिकडे दिवाळीचा भव्य आनंद सोहळा असतो आणि यंदा आम्हाला त्यात सामील होता येणार आहे. हा असा अनुभव असेल, जो मी कायमसाठी माझ्या मनात जपून ठेवीन.”
‘बादल पे पांव है’ मालिकेत बानीची भूमिका करणारी अमनदीप सिद्धू म्हणते, “मला माझ्या सह-कलाकारांसोबत आणि क्रूसोबत, विशेषतः जे आपल्या घरापासून लांब असतात त्यांच्यासोबत सेटवर सण साजरे करायला, सगळ्यांसोबत छोट्या छोट्या भेटवस्तूंची आणि मिठाईची देवाणघेवाण करायला आवडते.खास करून दिवाळीच्या दिवसांत सगळ्यांना, ते प्रत्यक्षात कुठेही असले तरी,स्वतःच्या घरी असल्यासारखे वाटले पाहिजे आणि त्या आनंदोत्सवात सामील होता आले पाहिजे असे मला वाटते.”