Home Uncategorized शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी रोजगार मेळावा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी रोजगार मेळावा

4 second read
0
0
92

no images were found

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शनिवारी रोजगार मेळावा

         कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी शनिवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे ‘रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

          जिल्ह्यातील नामांकित 40 पेक्षा अधिक खासगी आस्थापनांचा 3 हजार पेक्षा जास्त रिक्तपदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून यामध्ये 7 वी ते पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअर इ. नोकरी इच्छुक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे निवड केली जाणार आहे.

रिक्तपदांची माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर संपर्क साधावा. मेळावा विनामूल्य असून नोकरी इच्छुक जास्तीत- जास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असेही श्री. माळी यांनी कळविले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…