Home राजकीय कमी पटसंख्येच्या शाळा बंद धोरणविरोधात ‘आप’चे आंदोलन

कमी पटसंख्येच्या शाळा बंद धोरणविरोधात ‘आप’चे आंदोलन

0 second read
0
0
61

no images were found

कमी पटसंख्येच्या शाळा बंद धोरणविरोधात ‘आप’चे आंदोलन

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना निवेदन

पुणे : राज्यातील वीसपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात मंगळवारी आम आदमी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. शासनाच्या विसंगत धोरणामुळे नुकसान होत असून, शाळा बंदचे धोरण जबरदस्तीने राबवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या प्रक्रियेसंबंधी हालचाली सुरू असल्याच्या संदर्भाने आम आदमी पक्षातर्फे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कमी पटसंख्येच्या शाळा बंद निर्णयास विरोध असणारी निवेदने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना देण्यात आली. निवेदनात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्काच्या पूर्ततेसाठी नजीकच्या परिसरात शाळा उपलब्ध करून देणे ही शासनाच्या जबाबदारी असून एकाही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये, विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये ही प्राथमिकता हवी. शाळा बंदच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील वंचित, दुर्बल आदिवासी घटक, मुख्यत्वे मुलींना फटका बसेल, असे नमूद करण्यात आलेले आहे. या आंदोलनात आम आदमी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत व ललिता गायकवाड, नीलेश वांजळे, सिमा गुट्टे, सुरेखा भोसले, सतीश यादव, अनिल कोंढाळकर, सुनीता सेरखाने, शंकर थोरात आदी सहभागी होते.

Load More Related Articles

Check Also

मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी- मुख्यमंत्री 

मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘व्हॉट्सअप’वर उपलब्ध करावी- मुख्यमंत्री…